Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. लॉकडाऊनच्या काळात हा शो घराघरांत मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. अनेक नवोदित कलाकारांना या शोमुळे एक वेगळी ओळख मिळाली. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या शोचे चाहते आहेत. अमेरिका, सिंगापूर, दुबई, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये शो झाल्यावर आता नुकताच हास्यजत्रेचा लंडन दौरा यशस्वीपणे पार पडला. यावरून या शोची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज येतो.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं नवीन पर्व २ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. यानिमित्ताने सध्या प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या नव्या पर्वात प्रेक्षकांना काय-काय गमतीजमती पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली आहे. अशातच सेटवरचा एक पडद्यामागचा व्हिडीओ अभिनेत्री नम्रता संभेरावने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरून हे सगळे कलाकार प्रत्येक स्किटसाठी किती मेहनत घेतात याची माहिती मिळते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

हास्यजत्रेच्या सेटवर सुरू आहे रिहर्सल, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री नम्रता संभेरावने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिवाली परब, प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकर, मंदार मांडवकर, निखिल बने, दत्तू मोरे असे सगळे कलाकार एकत्र बसून रिहर्सल करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नम्रताने शेअर केलेल्या रिहर्सलच्या व्हिडीओमध्ये शिवाली परब मालवणी भाषेत भन्नाट ‘टंग ट्विस्टर’ बोलत असल्याचं पाहायला मिळत आहेत. यामध्ये अन्य कलाकार सुद्धा एकदम हसून-खेळून रिहर्सल करत असल्याचं दिसतंय. नम्रता संभेरावने या व्हिडीओला ‘रिहर्सल ऑन फायर’ असं कॅप्शन देत उपस्थित सर्व कलाकारांना टॅग केलं आहे.

हेही वाचा : दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं नवीन पर्व

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या शोने ब्रेक घेतला होता. त्यामुळे प्रेक्षक हा शो पुन्हा कधी सुरू होईल याची आतुरतेने वाट पाहत होते. 

अखेर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा-कॉमेडीची हॅटट्रिक!’ या नव्या सीझनची सुरुवात २ डिसेंबरपासून झालेली आहे. सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra ) हा शो प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

Story img Loader