Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचा चाहतावर्ग केवळ देशातच नव्हेतर संपूर्ण जगभरात आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. हास्यजत्रेचे कलाकार व त्यांची टीम अनेकदा परदेश दौऱ्यावर जात असते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई अशा विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे शो आयोजित केले जातात. परदेशात सुद्धा या मराठमोळ्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. सगळे शो हाऊसफुल्ल असतात. आता पुन्हा या एकदा हरहुन्नरी कलाकारांची टीम परदेशात राहणाऱ्या मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra ) टीमच्या अमेरिका दौऱ्याची चर्चा सुरू आहे. अखेर हे सगळे कलाकार मंगळवारी रात्री अमेरिकेच्या दिशेने रवाना झाले आहेत. विमानतळावर एकत्र जमून, आपल्या कुटुंबीयांसह फोटो काढून हे सगळे कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या कलाकारांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Lakshmi Niwas Marathi Serial Jahnavi take ukhana for Jayant
Video: “रायगडावर आहे स्वराज्याची राजधानी…”, ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीने जयंतसाठी घेतला जबरदस्त उखाणा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
jackie shroff marathi movie
जॅकी श्रॉफ तब्बल १० वर्षांनी दिसणार मराठी सिनेमात, सोबतीला ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

हेही वाचा : Video : “जहां मैं जाती हूँ…”, ७० वर्षांपूर्वीच्या गाण्यावर सचिन-सुप्रिया यांचा रोमँटिक अंदाज! कमेंट्समध्ये लेक श्रिया म्हणते…

हास्यजत्रेचे कलाकार निघाले अमेरिका दौऱ्यावर

अभिनेता प्रसाद खांडेकरने विमानतळावरील व्हिडीओ शेअर करत त्याला “अमेरिका कॉलिंग ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ लाइव्ह सीझन २” असं कॅप्शन दिलं आहे. चेतना भट, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, इशा डे, समीर चौघुले, प्रभाकर मोरे हे सगळे कलाकार अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहे.

अमेरिकेतील एकूण ११ शहरांमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra ) कार्यक्रमाचे शो पार पडणार आहे. हे शो १९ सप्टेंबर २०२४ ते ६ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान पार पडतील. अनुक्रमे शार्लोट, वॉशिंग्टन डीसी, बोस्टन, न्यू जर्सी, शिकागो, डॅलस, ऑस्टिन, ह्युस्टन, सिएटल, सॅन जोस, लॉस एंजेलिस या शहरांमध्ये हे शो आयोजित करण्यात आले आहेत. आता हे सगळे कलाकार पुढचे १५ ते २० दिवस अमेरिका दौऱ्यावर कशी धमाल करतात हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

हेही वाचा : देशमुखांच्या सुनांनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप! जिनिलीयाने मोठ्या जाऊबाईंसह शेअर केला खास व्हिडीओ, कॅप्शनने वेधलं लक्ष

Maharashtrachi Hasya Jatra
नम्रता संभेरावची इन्स्टाग्राम स्टोरी ( Maharashtrachi Hasya Jatra )

दरम्यान, लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव सुद्धा या टीमबरोबर परदेशात निघाली आहे. तिचा लेक रुद्राज खूपच लहान आहे. त्यामुळे अभिनेत्रीने कामानिमित्त बाहेरगावी निघण्यापूर्वी लेकाबरोबरचा गोड फोटो शेअर करत “आय लव्ह यू माय बॉय…माय लाइफ” असं कॅप्शन फोटोला दिलं आहे.

Story img Loader