‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वी हास्यजत्रेची संपूर्ण टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. तेथील महत्त्वाच्या शहरांमध्ये हास्यजत्रेचे कार्यक्रम पार पडले. याशिवाय या संपूर्ण टीमने ऑस्ट्रेलियात एकत्र धमाल केल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हास्यजत्रेचे कलाकार आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत आहेत. अभिनेत्री वनिता खरातने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने परदेशात जाऊन साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “पळून जाऊन कोर्ट मॅरेज केलं, पण…”, स्मिता तळवलकरांनी लावलेलं सुचित्रा व आदेश बांदेकरांचं विधीवत लग्न, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

“परदेशात साडी नेसून फिरण्यात एक वेगळीच मज्जा आहे” असं कॅप्शन देत वनिताने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने शेवाळी रंगाची साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. यावर वनिताने खास प्राजक्ता माळीच्या प्राजक्तराज ब्रॅन्डचे दागिने परिधान केले होते. याशिवाय अभिनेत्रीनेचा हा व्हिडीओ पृथ्वीक प्रतापने शूट केला असून नम्रता संभेरावने एडिट केला आहे.

हेही वाचा : Video : लाल साडी, भरजरी दागिने, केसात गजरा अन्…; अखेर समोर आला ‘पुष्पा २’च्या श्रीवल्लीचा पहिला लूक

दरम्यान, वनिता खरातच्या व्हिडीओवर परदेशात साडी परिधान केल्याबद्दल नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीचा पती सुमीत लोंढेने कमेंट करत “माय लव्ह” असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra vanita kharat wear saree in australia video viral sva 00