‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये काम करणारे बरेच कलाकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. आपल्या विनोदी बुद्धीने या कार्यक्रमाती कलाकारांनी प्रेक्षकांना आपलसं केलं आहे. आपल्या आवडत्या कलाकरांबाबत जाणून घेण्यासही प्रेक्षकांना फार आवडतं. आता या कार्यक्रमातील अशाच एका कलाकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन पार्टीत रितेश-जिनिलीयाची चर्चा, देशमुखांच्या सूनेचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले “तुला हे…”

या कार्यक्रमातील समीर चौगुले, गौरव मोरे, निखिल बने, नम्रता संभेराव, दत्तू मोरे यांसारखे कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास भाग पाडतात. यातीलच एक कलाकार म्हणजे रोहित माने. रोहितची हटके स्टाइल प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी असते. त्याच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच पार पडला. यावेळी त्याने पत्नीबरोबरचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले.

पाहा फोटो

रोहितने पत्नी श्रद्धा किरवेला किस करतानाचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. हा फोटो शेअर करत तो म्हणाला, “बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. लव्ह यु”. रोहित व त्याच्या पत्नीचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – “तू जिंकला नाहीस पण…” ट्रॉफी हुकल्यानंतर शिव ठाकरेसाठी ‘बिग बॉस’च्या ‘त्या’ स्पर्धकाची पोस्ट, नेटकरी म्हणतात, “आपला मराठी माणूस…”

जोडी मस्त आहे पण किस करतानाचे फोटो पोस्ट करू नको, तुम्ही सेलिब्रिटी लोक ट्रीपलाही फोटोग्राफर बरोबर घेऊन जाता का?, खासगी फोटो पोस्ट करणं टाळा अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. रोहितची पत्नी एचआर म्हणून एका कंपनीमध्ये नोकरी करते. या कपलच्या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra actor rohit mane liplock with wife photos goes viral on social media see details kmd
Show comments