छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. गेले कित्येक दिवस या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरु करा अशी मागणी प्रेक्षकांकडून सातत्याने करण्यात येत होती. यामुळेच या कार्यक्रमाचे नवे पर्व १४ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पुन्हा सुरु होणार आहे. कार्यक्रम पुन्हा सुरु होण्यापूर्वी सर्व कलाकार प्राजक्ता माळीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या ‘प्राजक्तकुंज’ या कर्जत येथील फार्महाऊसवर गेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : “जय शिवराय!”, ‘सुभेदार’ चित्रपटातील कलाकारांसह मरीन ड्राईव्हवर थिरकली तरुणाई, व्हिडीओ व्हायरल

प्राजक्ता माळीने हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमबरोबर कर्जत येथील फार्महाऊसवर वाढदिवस साजरा केला. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अभिनेत्रीने सर्व कलाकारांचा फार्महाऊसवर मजा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हास्यजत्रेची संपूर्ण टीम सुट्ट्यांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडीओमध्ये प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “मुंबईच्या लोकल ट्रेनची भीती…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला अनुभव; म्हणाली, “बायका मला ढकलून…”

अरुण कदम, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, सचिन मोटे, ओंकार राऊत अशी हास्यजत्रेची संपूर्ण टीम प्राजक्ताच्या फार्महाऊसवर गेली होती. याला कॅप्शन देत अभिनेत्रीने “प्रत्येक रविवार असाच असला पाहिजे” असे म्हटले आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतचं गाणं ऐकून श्रद्धा कपूर भारावली; मराठीत कमेंट करत म्हणाली, “किती गोड…”

प्राजक्ताने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका युजरने “रविवारचा आनंद लुटण्याचा खूप छान मार्ग… आनंद घेत राहा” अशी कमेंट यावर केली आहे. तर, अन्य काही युजर्सनी “हास्यजत्रेचे कुटुंब आम्हाला आमच्या कुटुंबाप्रमाणे वाटते”, “हे भगवंता लय भारी बाबा तुमची मजा” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra actors visits prajakta mali farmhouse in karjat video viral sva 00