छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील हास्यवीर विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात.  याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. मालवणी भाषेतून केलेले तिचे विनोद प्रेक्षकांना खूप आवडतात. रसिकाने नुकतीच समीर चौगुलेंसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- शिव ठाकरेचा त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल मोठा खुलासा, म्हणाला, “माझ्या आयुष्यात…”; वीणा जगतापच्या नावाचाही उल्लेख

International Microorganism Day Marathwada and Maharashtra need to get rid of harmful chemical farming
आता मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतीसाठी ‘जैविक संग्राम’ हवा!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sarbanand Sonowal asserts that the port is an attraction for the world
वाढवण बंदर जगासाठी आकर्षणबिंदू -सोनोवाल
vijay wadettiwar criticized shinde govt
“महाराष्ट्राचं भल व्हावं, असं वाटत असेल तर…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
regional discrimination, textile industry policy,
सांगली : वस्त्रोद्योग धोरणात प्रादेशिक भेदभावाचा आरोप, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय – किरण तारळेकर
Maharashtrian Khichdi Recipe In Marathi Tur dal ani Val Khichdi Recipe In Marathi
तूर आणि वालाची मसाला खिचडी; रात्रीच्या जेवणाला १० मिनिटांत बनवा अस्सल महाराष्ट्रीयन बेत
Maharashtra Crime News
Crime News : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? बदलापूर, मुंबई अकोल्यासह मुलींवर अत्याचाराच्या मन सून्न करणाऱ्या घटना

रसिकाने समीरबरोबरचा एक फोटो शेयर केला आहे. यामध्ये हास्यजत्रेच्या सेट बाहेर दोघेही उभे असून समीर रसिकाला एक कॅटबरी देताना दिसत आहे. फोटोबरोबर रसिकाने एक भावनिक कॅप्शन दिले आहे. रसिकाने पोस्टमध्ये लिहिलं आहे. सादरीकरण आवडलं की दादा नेहमीच कौतुक करतो . पण एका विशेष स्किटसाठी दादाने आवर्जुन हे बक्षिस दिलं… Thank you सो much दादा.. तू कौतुक करतोस .. चूकाही सांगतोस.. आणि वेळोवेळी प्रोत्साहनही देतोस.. त्या सगळ्यासाठी खूप प्रेम.. या स्किटचाचा लेखक म्हणून हे गिफ्ट मी तुझ्याबरोबर शेयर करणार आहे पशा (प्रसाद खांडेकर)” 

हास्यजत्रेतील एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. समीर केवळ अभिनेता नाही तर ते या कार्यक्रमात लेखकही आहेत. आजवर त्यांनी आपल्या लेखनीने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रेतून प्रेक्षकांना हसवणारे समीर चौघुले सध्या ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. चौघुलेंनी मालिकांबरोबरच अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं आहे.