छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यातही त्यांच्या चाहत्यांना अधिक रस असतो. यामधील बरेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. गेल्या काही दिवसांपासून वनिता तिच्या लग्नाबाबतच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – वनिता खरातच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्यानेही हातावर काढली मेहेंदी

आज (२ फेब्रुवारी) वनिता विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्न विधींना आता सुरुवात झाली आहे. याआधीही वनिताने तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिच्या हातावर सुमितच्या नावाची मेहेंदी रंगली असल्याचं दिसत होतं. शिवाय वनिताची हळदही अगदी जोरदार झाली. वनिता वरळी कोळीवाड्यामध्ये राहते. तिथेच तिचा हळदी सोहळ्याचा कार्यक्रमही पार पडला.

शिवाय वनिताने हातातील हिरवा चुड्याचा फोटोही शेअर केला होता. आता वनिताच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच सुमितने लग्नविधींना सुरुवात झाली असल्याचं म्हटलं आहे. सुमितने त्याच्या घरातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो घरातील देवाऱ्यासमोर उभा राहून नमस्कार करताना दिसत आहे.

आणखी वाचा – Video : लग्नानंतर अथिया शेट्टी व केएल राहुलची जोरदार पार्टी, एकमेकांना केलं किस, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हॅशटॅग सुरुवात असं सुमितने हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे. यावेळी सुमित अगदी साध्या लूकमध्ये दिसला. त्याने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच वनिताने सुमितबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत प्रेमाची कबुली दिली. आता या दोघांची लगीनघाई सुरू झाली आहे.