‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasyajatra ) आणि ‘चला हवा येऊ द्या’ हे मराठीतील दोन लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. मागील सहा वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. तसंच ‘चला हवा येऊ द्या’ ( Chala Hawa Yevu Dya ) कार्यक्रमाने देखील १० वर्ष अविरत मनोरंजन केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरीही या कार्यक्रमातील कलाकार नेहमी चर्चेत असतात. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांची अचानक भेट झाली. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या ‘मधील कलाकारांच्या भेटीचा फोटो अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने ( Prasad Khandekar ) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नम्रता संभेराव, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, अरुण कदम, समीर चौगुले, नेहा खान हे अवलिय कलाकार पाहायला मिळत आहे. प्रसाद खांडेकरने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, लवकरच….पुन्हा भेटू आणि खूप गप्पा मारू असं एकमेकांना प्रॉमिस करून निघालो आम्ही. आज अचानक गाठ पडली…मित्रांबरोबर एक प्रसन्न सकाळ.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा – ‘झी मराठी’वर सुरू होणार ‘लक्ष्मी निवास’! कन्नड मालिकेचा रिमेक, प्रमुख भूमिकांसाठी ‘या’ दोन नावांची चर्चा

अभिनेता कुशल बद्रिकेने देखील या अचानक भेटीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानं लिहिलं आहे की, जबरी.

हेही वाचा – आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली वाजवली! दोघींमध्ये जोरदार वाद; ‘बिग बॉस’ देणार शिक्षा; म्हणाले, “हे अतिशय निंदनीय…”

Kushal Badrike Post
Kushal Badrike Post

हेही वाचा – Video: सलमान खानने मलायका अरोराच्या कुटुंबाचे केले सांत्वन, अभिनेत्रीच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी केली आत्महत्या

फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

दरम्यान, प्रसाद खांडेकरने शेअर केलेल्या फोटोवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “झुंड आहे”, “तुम्ही सर्व महाराष्ट्राची शान आहात”, “काहीतरी कॉमेडी शो येतोय वाटतं?”, “कॉमेडीचे मल्टीवर्स”, “तुम्हाला सगळ्यांना एकत्र पाहून आनंद झाला”, अशा प्रकारच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Story img Loader