Maharashtrachi Hasyajatra : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील या कार्यक्रमाला आजही तितकाच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार घराघरात पोहोचले आहेत. कलाकारांच्या विनोद शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने सिनेसृष्टीला बरेच नवोदित कलाकार दिले; जे आता मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही उत्कृष्ट काम करताना दिसत आहेत. अशातच या कलाकारांच्या तालीमचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रसाद खांडेकरने तालीमचा व्हिडीओ शेअर केला आहे. “भजनाच स्कीट असेल तर तालीमला एक वेगळाच उत्साह असतो,” असं कॅप्शन लिहित प्रसादने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, प्रसाद खांडेकरसह अभिनेत्री शिवाली परब, श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात, निखिल बने, प्रभाकर मोरे, अरुण कदम, समीर चौघुले असे सगळे कलाकार मंडळी पाहायला मिळत आहे. यामध्ये भजनाच्या स्कीटची तयारी करताना सर्व कलाकार दिसत आहेत. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’, ‘गणा धाव रे’ ही लोकप्रिय गाणी सर्व कलाकार उत्साहात गाताना पाहायला मिळत आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

हेही वाचा – Video: आठवड्याची सुरुवात भांडणाने! निक्कीने इतरांचे कपडे फेकत घातला वाद, अंकिता वालावलकरला दिला धक्का अन्…

हेही वाचा – Video: जान्हवी किल्लेकरची अंकिताने सांगितलेली ‘ती’ कृती ऐकून रितेश देशमुखला बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाला…

प्रसाद खांडेकरने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अरे वा”, “खूप छान”, “सगळे जण गणपती भजन घेऊन या”, “तुम्ही जे करता ते लोकांना खूप साधं वाटतं पण तुमचं पाठांतर मेहनत खूप असते दादा”, अशा प्रतिक्रियांच्या माध्यमातून चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे.

हेही वाचा – कोणी धरली राजकारणाची वाट, तर कोणी गाजवतंय हिंदी मनोरंजनसृष्टी, ‘बिग बॉस मराठी’चे विजेते सध्या काय करतात? जाणून घ्या…

हास्यजत्रेचा लवकरच कॅनडा दौरा

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा आता कॅनडा दौरा होणार आहे. ऑक्टोबरला हास्यजत्रेतील कलाकार कॅनडातील प्रेक्षकांच्या खळखळून हसवण्यासाठी जाणार आहेत. १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंतचा हा दौरा असणार आहे. याआधी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा दौरा ऑस्ट्रेलिया, अमेरिकेला झाला होता.

Story img Loader