‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता दत्तू मोरेच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने दत्तूने बायकोबरोबरचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. रोमँटिक आणि लग्नाचे फोटो शेअर करत दत्तू मोरेने लिहिलं आहे, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. असेच छान राहू आणि एकमेकांना सांभाळून घेत जाऊ. आय लव्ह यू सो मच….उम्म्म्मम गिफ्ट…लवकरच.”

दत्तू मोरेच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसह चाहत्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण दत्तूच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने त्याची फिल्मी लव्हस्टोरी काय होती? कोणी कोणाला आधी प्रपोज केलं? आणि दोन्ही कुटुंबाचा लग्नाला तीव्र विरोध का होता? जाणून घ्या…

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात समांथा प्रभूची जागा घेणार ‘ही’ अभिनेत्री? रणबीर कपूरसह इंटीमेट सीन देऊन रातोरात झाली नॅशनल क्रश

दत्तू मोरेच्या पत्नीचं नाव स्वाती घुनागे आहे. ती मूळची पुण्याची असून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आहे. पुण्यात, ठाण्यात तिचं स्वतःचं क्लिनिक आहे. याशिवाय स्वाती सामाजिक कार्यात देखील सक्रीय असते. दत्तू आणि स्वातीची पहिली भेट ६-७ वर्षांपूर्वी राहुल नावाच्या कॉमन मित्रामुळे झाली होती. या भेटीनंतर दोघं फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. दोन वर्ष फक्त दोघं फेसबुक फ्रेंड होते. दोघं एकमेकांशी बोलत नव्हते. पण काही वर्षांनी दत्तू आणि स्वाती बोलू लागले. स्वाती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम बघायची. त्यानिमित्ताने तिने एकेदिवशी दत्तूला मेसेज केला आणि मग दोघं एकमेकांशी खऱ्या अर्थाने बोलू लागले.

जेव्हा दोघं बोलू लागले तेव्हा स्वातीचं एमएस शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यानंतर तिच्या कामात ती व्यग्र झाली आणि दत्तू त्याच्या कामात व्यग्र होता. पण दोघं कामातून वेळ काढून एकमेकांशी गप्पा मारायचे. त्यामुळे यादरम्यान दोघं एकमेकांच्या कधी जवळ आले, हे त्यांनाच कळालं नाही. हळूहळू स्वातीला दत्तू आवडू लागला होता. तिने अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती मेसेज डिलीट करायची. दत्तूच्या हे लक्षात आलं होतं. पण अखेर स्वातीनेचं लग्नासाठी दत्तूला विचारलं. अभिनेत्याने लगेच होकार दिला नाही. कामाकडे अधिक लक्ष देण्यासाठी दत्तूने स्वातीला होकार कळवायला एक-दोन वर्ष लावली. त्यानंतर दोघांचं प्रेम फुलतं गेलं. होकार दिल्यानंतर दोघांचं आपोआप बोलणं देखील वाढलं. दिवसभर काम असल्यामुळे सकाळी ४ ते ४.३० वाजेपर्यंत दोघं एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारायचे. पण लव्हमॅरेज म्हटलं की, घराच्यांचा सुरुवातीला विरोध आलाच. तसंच दत्तू आणि स्वातीच्या बाबतही घडलं.

हेही वाचा – Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची ‘या’ लोकप्रिय मालिकेत दमदार एन्ट्री, पाहा व्हिडीओ

दत्तू आणि स्वातीच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता. स्वाती डॉक्टर असल्यामुळे तिच्या बाबांची इच्छा होती की, जावई देखील डॉक्टर असावा. दत्तूबद्दल पहिल्यांदा सांगितल्यानंतर स्वातीच्या वडिलांचा नकाराचाच सूर होता. शेवटी दत्तूने स्वातीच्या वडिलांना भेटायचं ठरवलं. दत्तूने भेट घेऊन स्वातीच्या वडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. लग्न न करण्याचं हे कारण आपल्याला काही शोभणार नाही. तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते मला सांगा. मला कुठल्याही गोष्टीचं व्यसन नाही. त्यानंतर स्वातीच्या वडिलांनी विचार केला. स्वातीने देखील आपल्या बाबांना समजावलं. स्वातीच्या वडिलांनी थोडा वेळ घेतला पण त्यानंतर दोघांच्या लग्नाला होकार दिला.

स्वातीचे आई-वडील तयार झाले. मात्र दत्तूच्या आई-वडिलांची समजूत काढणं बाकी होतं. लव्हमॅरेजमुळे आई-वडील भडकणार हे दत्तूला माहित होतं. अभिनेत्याच्या आईची लग्नासाठी काही हरकत नव्हती, पण तिला एक अडचण होती की, समाज लव्हमॅरेजविषयी काय म्हणेल. या कारणामुळे त्या नकार देत होत्या. म्हणून दत्तूने आधी आईला समजावलं. शिवाय त्याने तीन बहिणींना देखील आईला मनवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितला. १० ते १२ दिवस हे चालू होतं. अखेर करा, आता काय असं म्हणून दत्तूच्या आईने होकार दिला. लग्नाच्या १०-१२ दिवसाआधी दत्तूने बाबांना सांगितलं. कूरकूर करीत बाबांनी लग्नाला संमती दिली. या सर्व अडचणीला मात देत २३ मे २०२३ रोजी दत्तू आणि स्वातीने कोर्टमॅरेज केलं. दोघांच्या लग्नाचा फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण दत्तूने अजिबात त्याच्या लग्नाविषयी कुठेही चर्चा केली नव्हती. साध्या पद्धतीने दोघांचं लग्न झालं होतं.

Story img Loader