‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमात दिसणारे कलाकार कायमच चर्चेत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणाऱ्या कलाकारांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला आहे. यात अभिनेत्री विशाखा सुभेदार, ओंकार भोजने आणि पंढरीनाथ कांबळे यांनीही या कार्यक्रमातून एक्झिट घेतली. यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला. या कलाकारांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यानंतर आता दिग्दर्शकाने पोस्ट शेअर केली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी काहीही उल्लेख केलेला नाही. मात्र ती पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
आणखी वाचा : “२० टक्के वाढीसाठी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज
सचिन गोस्वामीची पोस्ट
“मोराने पिसारा फुलवत थुई थुई नाचावे.. बगळ्याने उंच भरारी घ्यावी. मोराने बगळ्याचे अनुकरण करू नये, बगळ्याने मोराचे अनुकरण करू नये. आपली क्षमता, विशेषता ओळखावी, नैसर्गिकता जपावी. सौंदर्य त्यातच आहे. कलाकृतीचेही असेच असते”, अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी शेअर केली आहे.
आणखी वाचा : “कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा…” पॅडी कांबळेने सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण
सचिन गोस्वामी यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ‘टोमणा की सुविचार? असा प्रश्न एका नेटकऱ्याने केला आहे. त्यावर सचिन गोस्वामी यांनी आत्मचिंतन…असे म्हटले आहे.
दरम्यान ओंकार भोजने, पंढरीनाथ कांबळे हे कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून एक्झिट घेतली आहे. ते दोघेही झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात झळकताना दिसत आहे. फू बाई फू हा कार्यक्रम तब्बल ८ वर्षांनंतर सुरु झाला आहे. या कार्यक्रमाला २०१० मध्ये सुरुवात झाली होती. हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. हा कार्यक्रम २०१४ मध्ये बंद झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु झाला आहे. याचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत.