महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे कायमच चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते अनेकदा विविध विषयांवर भाष्य करत असतात. नुकतंच त्यांना ‘मज्जा डिजिटल अवॉर्ड’ मिळाला आहे. यानिमित्ताने त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सचिन गोस्वामी यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते एक पुरस्कार घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे. या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : “माझ्या आईनेच…” ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकरच्या पहिल्या ब्रेकअपची गोष्ट
सचिन गोस्वामीची पोस्ट
“कधी कधी असे प्रसंग येतात की पुर्णतः आपले नसलेले हातात घेऊन फोटो काढायचा म्हंटले की चेहऱ्यावर ऑकवर्ड भाव येतात…हा प्रसंग असाच. हास्यजत्रासाठी लेखनाचा मज्जा डिजिटल अवॉर्ड मला आणि सचिन मोटेला देण्यात आला.. सचिन हा लेखक आहेच, लेखन टीमचे सूत्र त्याच्याकडेच आहे. पण मला लेखनाचा पुरस्कार हा प्रतिनिधी म्हणून मिळाला असावा. खरं तर यात माझा वाटा खारीचा.
सगळा अवघड पुल आमच्या लेखक मित्रांनी बांधला..सचिन मोटे, विनायक पुरुषोत्तम, समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, अभिजीत पवार, श्रमेश, प्रथमेश, अमोल पाटील, ऋषिकांत राऊत, विनोद गायकर, स्वप्निल जाधव. हे खरे या सन्मानाचे मानकरी.. सातत्य पूर्ण लेखन हा निव्वळ योगायोग नसून हे एक उत्कृष्ठ टीमवर्क आहे हे तुम्ही सिद्ध केलं..अभिनंदन…आणि धन्यवाद तुमच्या श्रमावर मला एक फोटो काढता आला…”, असे सचिन गोस्वामी म्हणाले.
आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले
दरम्यान ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे आज लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारी सगळीच कलाकार मंडळी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात. समीर चौघुले, वनिता खरात, नम्रता संभेराव, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर अशा विनोदवीरांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षक आवडीने पाहतात.