छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. प्रेक्षकही या हास्यवीरांवर भरभरुन प्रेम करतात. अभिनेता गौरव मोरेलाही याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली. गौरवने अल्पावधीतच त्याच्या अभिनय कौशल्याने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने नुकतंच ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात हजेरी लावली. नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, पृथ्वीक प्रताप यांसह लेखक, दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटेही उपस्थित होते. या कार्यक्रमात हास्यजत्रेच्या टीमने अनेक मजेशीर किस्से शेअर केले. शूटिंगनिमित्त लंडनला गेलेल्या गौरव मोरेचा किस्साही सचिन गोस्वामी यांनी सांगितला.

हेही वाचा >> मराठी कलाकाराने दिवाळीच्या मुहुर्तावर खरेदी केली ‘महिंद्रा थार’, व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला…

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी गौरव मोरे लंडनला गेला होता. त्याच्यासह मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधवही होते. भरत जाधव आणि गौरव मोरे विमानात बसल्यानंतरचा एक किस्सा सचिन गोस्वामी यांनी सांगितला. ते म्हणाले, “विमानात बसल्यानंतर भरत जाधवने मला फोन केला. माझ्याबरोबर गौरव आहे. त्यामुळे मला तू आशीर्वाद आणि शुभेच्छा दे. कारण मी आणि गौरव इंग्लंडला जात आहोत. आणि आमच्या दोघांनाही इंग्रजी येत नाही”. गौरव मोरेने त्याच्या सोशल मीडियावरुन या कार्यक्रमातील प्रोमो व्हिडीओ शेअर केले आहेत.

हेही पाहा >> Photos : विजय देवरकोंडाचा फोटो पाहताच सायली संजीव लाजली, म्हणाली “माझं तुझ्यावर…”

हेही वाचा >> दिवाळीत होळी साजरी करतेय विराट कोहलीची लेक, वामिकाचा फोटो शेअर करत अनुष्का म्हणाली…

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी ओळख असणाऱ्या गौरव मोरेने त्याच्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्याच्या विनोद बुद्धीचे लाखो चाहते आहेत. लवकरच गौरव पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी तो ‘हवाहवाई’ या चित्रपटात झळकला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra director sachin goswami shared bharat jadhav and gaurav more london english talking experience kak
Show comments