बीडचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना काही अभिनेत्रींची नावं घेतली. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा समावेश होता. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याच प्रकरणावर २८ डिसेंबरला प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याप्रकरणावरून प्राजक्ता माळी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. यावेळी सुरेश धस यांनी केलेले आरोप याची वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडून कठोर कारवाई करण्याची मागणी असल्याचं प्राजक्ताने पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती प्राजक्ताने दिली. याशिवाय करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर देखील अभिनेत्रीने आपलं मत मांडलं. “तुम्ही महिला आहात. तुम्ही महिलांना होणारा त्रास समजू शकता. त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणत्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय वक्तव्य करणार नाहीत, अशी खात्री बाळगते”, असं प्राजक्ता म्हणाली. या संपूर्ण प्रकरणावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे दिग्दर्शक यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले, “ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे. क्लेषदायक आहे. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.” सचिन गोस्वामी यांची पोस्ट पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हेही वाचा – फोटोतील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्यांना ओळखलंत का? लवकरच दोघांचा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीस
सचिन गोस्वामी यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, समाज सुसंस्कृत असतोच पण नेते नसतात. पण नेत्यांची, लोकप्रतिनिधींची निवड समाज करतो तेव्हा जनता मतदान करताना नेते कसे असतात हे विचारात घेऊन मतदान करत नाही हेच दुर्दैव. सुरेश धसचा निषेध. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “समाज बिघडला आणि म्हणून असे राजकारणी निपजले. अशा कथित राजकीय नेत्यांना भर चौकात चाबकाने फोडले पाहिजे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, वड्याचं तेल वांग्यावर काढतात.