अफलातून अभिनय व विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार छोट्या पडद्यावरील लाडका कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या शोचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील विनोदवीर विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार हास्यजत्रेचे चाहते बनले आहेत. चाहत्यांच्या प्रेमापोटी हास्यजत्रेच्या कलाकारांनी पहिल्यांदाच परदेश दौरा केला. दुबईमध्ये हास्यजत्रेच्या कलाकारांची हास्याची मैफील रंगली. अफलातून विनोद शैलीने विनोदवीरांनी दुबईकरांनाही खळखळवून हसवलं. हास्यजत्रेतूनच फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेल्या गौरव मोरेलाही प्रसिद्धी मिळाली. गौरवला दुबईतही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. दुबईच्या रंगमंचावरील एक व्हिडीओ गौरवने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
हेही वाचा>> …अन् भर पार्टीत शरद केळकरला पत्नीने केलं किस, व्हिडीओ व्हायरल
रंगमंचावर गौरव विंगेतून चालत येताच “गौरव गौरव” असा जल्लोष चाहते करताना दिसत आहेत. चाहत्यांचं प्रेम पाहून गौरवही भारावल्याचं पाहायला मिळत आहे. गौरवने पोस्टद्वारे सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. “एक कलाकार म्हणून अजून काय पाहिजे….? मला फार बोलता येत नाही. पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलंत, करताय त्याचं ऋण कसं फेडावं…? हे काही मला सूचत नाहीये…फ़क़्त एवढच बोलू शकतो…मायबाप प्रेक्षकहो खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद दुबई…love you”, असं गौरवने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> वनिता खरात व रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
हेही वाचा>> “देवेंद्रजी, बायकोला मराठी बोलायला…”, मकर संक्रांतीच्या शुभेच्छांवरून अमृता फडणवीस ट्रोल
हास्यजत्रेतील स्कीटमधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या गौरवला मोठ्या पडद्यावरही झळकण्याची संधी मिळाली. ‘हवाहवाई’ या चित्रपटातून त्याने अभिनयाची छाप पाडली. आता लवकरच आणखी एका चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.