अभिनेता गौरव मोरे छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेला गौरव त्याच्या विनोद बुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवतो. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने मराठी चित्रपटसृष्टीतही वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच त्याने भारतीय संविधान दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरव मोरे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच गौरवने इन्स्टाग्रामवर भारतीय संविधान दिनानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. “आम्ही भारताचे लोक ??. भारतीय संविधान दिन”, असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्याबरोबर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. तसेच त्याने भारतीय असल्याचा अभिमान आहे असेही सांगितले आहे.

भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. १९४९ मध्ये यादिवशी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून संविधान देशात लागू झाले. यानंतर १९ नोव्हेंबर २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयाने २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. याच निमित्ताने गौरवने पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान गौरव मोरे हा चाहता वर्ग फार मोठा आहे. विनोदी अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. गौरव सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी गौरव हा ‘हवाहवाई’ चित्रपटात झळकला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तो लंडनमध्ये एका चित्रपटाच्या शूटींगनिमित्त गेला होता. त्यावेळी त्याचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actor gaurav more share dr babasaheb ambedkar video on indian constitution day post viral nrp