अभिनेता गौरव मोरे छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेला गौरव त्याच्या विनोद बुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवतो. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने मराठी चित्रपटसृष्टीतही वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गौरव सध्या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त लंडनमध्ये गेला आहे. तेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला त्याने भेट दिली. याचा फोटो गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्याने “भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे? या भराया आमुच्या, ही पाखरांची वंदना. तुमच्यामुळे आज आमच अस्तित्व आहे. आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा”, असं कॅप्शन दिलं आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”

हेही वाचा >> राजामौलींच्या चित्रपटात दीपिका पदुकोणची वर्णी? महेश बाबूसह पडद्यावर रोमान्स करणार असल्याच्या चर्चांना उधाण

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

लंडनमधील फोटो गौरवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरु शेअर केले आहेत. गौरवसह अभिनेता भरत जाधव, निखिल चव्हाण आणि माधुरी पवारही चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहेत. याआधी गौरव ‘हवाहवाई’ चित्रपटात झळकला होता.

हेही वाचा >> आलिया भट्ट गिरगावमधील ‘या’ रुग्णालयात देणार बाळाला जन्म

गौरवचा चाहता वर्ग फार मोठा आहे. विनोदी अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. गौरव सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. लंडनच्या रस्त्यावरील अभिनेता भरत जाधव आणि निखिल चव्हाण यांचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता.

Story img Loader