छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्राला ओळखले जाते. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार हे प्रसिद्धीझोतात आले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेले अभिनेता म्हणजे ओंकार राऊत. आता ओंकार एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे.
अभिनेता ओंकार राऊतने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ओंकार आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर दिसत आहे. ते दोघेही कुठेतरी फिरायला गेल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “शेवटचा हॅशटॅग महत्त्वाचा…” ओंकार राऊतच्या ‘त्या’ पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट चर्चेत
प्रियदर्शनीने हा फोटो स्टोरीला पोस्ट केला असून ओंकारने तो रिपोस्ट केला आहे. त्या फोटो स्टोरीला कॅप्शन देताना त्याने “नो कॉन्ट्रोवर्सी प्लीझ” असे म्हटले आहे. त्यांचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
ओंकार राऊत आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्या एका फोटोमुळे ते दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. प्रियदर्शनीने शेअर केलेला तो फोटो अभिनेत्री वनिता खरातच्या लग्नादरम्यानचा होता.
वनिताच्या लग्नसोहळ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे बरेच फोटोही व्हायरल झाले. पण प्रियदर्शनी आणि ओंकारच्या फोटोची विशेष चर्चा रंगली होती. मात्र त्या दोघांनीही आम्ही फक्त मित्र असल्याचे सांगत यावर स्पष्टीकरण दिले होते.