छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम पाहिला जातो. कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. अफलातून विनोद शैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या समीर चौगुलेंनाही याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली.

विनोदी नट म्हणून ओळख मिळवलेले समीर चौगुले विविधांगी भूमिका साकारताना दिसतात. आजवर अनेक मालिक व चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. त्यांच्या विनोदाच्या टायमिंगची खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा प्रशंसा केलेली आहे. याबरोबरच समीर हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. त्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात, पण नुकतंच त्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून एक खंत व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “हिला जराही…” बॅकलेस टॉप, हॉट स्कर्ट परिधान करून रिसेप्शनला आलेली दिशा पटानी होतीये ट्रोल

एका पोस्टच्या माध्यमातून समीर चौगुले यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. एका ऑनलाईन पोर्टलने ‘समीर चौगुले यांच्या आलीशान घराचे फोटो’ या मथळ्याखाली कोणत्यातरी भलत्याच घराचे फोटोज शेअर करत एक पोस्ट केली आहे. वास्तविक पाहता त्या फोटोमध्ये दिसणारं घर हर समीर यांचं नाही. त्यांनी स्वतः ही पोस्ट शेअर करत अशा बातम्या करणाऱ्या पोर्टल्सचे चांगलेच कान ओढले आहे.

samir choughule post
samir choughule post

समीर यांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत या खोट्या बातमीचा समाचार घेतला आहे. “माझ्या नसलेल्या मोठ्या घराचे फोटो ह्यांना कुठून मिळाले? जे अजून मी ही बघितले नव्हते. अरे बातम्या करायच्या म्हणून कोणाच्याही घराचे फोटो द्याल?..अशक्य थापाडी आहेत ही न्यूज पोर्टल्स” अशी पोस्ट करत समीर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. समीर चौगुले यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांनीही या अशा प्रकारावर टीका केली आहे. नुकतंच समीर चौगुले ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ चित्रपटात दिसले होते. ‘चंद्रमुखी’ चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Story img Loader