‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांना प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे. दत्तू मे महिन्याच्या अखेरीस लग्नबंधनात अडकला. दत्तूच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. नुकतंच त्याने लग्नानंतर पत्नीबद्दल कोणती गोष्ट कळली, याबद्दलचा खुलासा केला आहे.

दत्तू मोरेने नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने सविस्तर उत्तर दिले. यावेळी त्याने लग्नानंतर त्याची पत्नी स्वातीची चिडचिड होत असल्याचे सांगितले. तसेच तो ही चिडचिड घालवण्यासाठी काय करतो, याचाही खुलासा त्याने केला.
आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा

“लग्न झाल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे तिची फार चिडचिड होते. तिच्या कामामुळे कदाचित तिची चिडचिड होत असेल. ती सकाळी ६.३० ला उठते. त्यानंतर ती व्यायाम, अंघोळ वैगरे सर्व आवरते. यानंतर ती नाश्ता बनवते. त्यानंतर जेवण करते.यानंतर ती रुग्णालयात जाते. तिथे ओपीडीच्या सर्व गोष्टी पाहते. रुग्णालयातील व्यवस्थाही बघते.

याचदरम्यान ती दुपारी इतर घरातील गोष्टीही करत आहे. यानंतर संध्याकाळी घरी येते आणि जेवणाची तयारी करणं वैगरे यासर्व गोष्टी तिच्या दररोज सुरु असतात. ती दिवसभर खूप व्यस्त असते. या सर्व धावपळीमध्ये ती रात्री लवकर झोपते”, असे दत्तूने सांगितले.

आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

“ती लवकर झोपते ही गोष्ट खरंतर चांगली आहे. कारण मी सकाळी उठायच्याआधी तिच सर्व काम झालेलं असतं. मी सकाळी ८ किंवा ८.३० ला उठतो. मी उठण्यापूर्वीचं तिची लादी पुसणं, भांडी घासणं ही सर्व काम झालेली असतात. मी झोपून उठल्यानंतर मला डायरेक्ट जेवणचं मिळतं. या सर्व दिवसभरातल्या गोष्टीमध्ये तिची चिडचिड होते. पण जेव्हा तिची चिडचिड होते, तेव्हा तिला चहा द्यायचा. ती खूप चहाप्रेमी आहे. त्यानंतर ती शांत होते”, असा खुलासाही दत्तूने त्याच्या पत्नीबद्दल केला.