‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्वच कलाकार कायमच चर्चेत असतात. याच कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता दत्तू मोरे काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकला. दत्तू मोरेची पत्नी डॉक्टर आहे. नुकतंच दत्तूने तिच्या डॉक्टर असण्याचा काय फायदा झाला का? याबद्दल उत्तर दिले.
दत्तू मोरेची पत्नी ही डॉक्टर आहे. ती स्त्रीरोग तज्ञ असून तिचं पुण्यात स्वत:चं क्लनिक आहे. त्याबरोबर ती अनेक सामाजिक कार्यात सक्रीय असते. नुकतंच दत्तू मोरे आणि त्याची पत्नी स्वातीने ‘लोकमत फिल्मी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली.
आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”
यावेळी त्याला “तुझी पत्नी डॉक्टर असल्याचा काही फायदा झालाय का?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर तो हसत हसत मला तर याचा खूप फायदा झालाय असं म्हणाला.
“माझी पत्नी डॉक्टर असल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे औषध, गोळ्या फुकटात मिळतात. कुठेही तपासणी करायला जायची गरज लागत नाही. काहीही झालं तरी लगेचच ही गोळी घे, असं होतं”, असे दत्तू मोरे म्हणाला.
त्यावर त्याची पत्नी “मी तर एकदा इंजेक्शनही दिलं आहे”, असे म्हणते. दरम्यान दत्तूने मंगळवारी २३ मे २०२३ रोजी कोर्ट मॅरेज करत लग्नगाठ बांधली. दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं. त्याच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला होता.