‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नुकताच तिने तिचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. नुकतंच नम्रताने तिच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या खास गिफ्टबद्दलचा व्हिडीओ शेअर केला आहे.

नम्रता संभेरावने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नम्रता ही तिचा लेक रुद्रराजबरोबर बसल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी रुद्रराजने आईसाठी छान शुभेच्छा पत्र लिहिलं होतं. त्यावर त्याने स्वत:च्या हस्ताक्षराने ‘हॅपी बर्थडे आई’, असे लिहिले होते. त्याबरोबरच त्याने खाली फुलंही काढलं होतं.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

do you heaven in Maharashtra Jivdhan Fort 100 km away from pune watch video goes viral
Pune : महाराष्ट्रातील स्वर्ग! पुण्याहून फक्त १०० किमीवर आहे ‘हा’ किल्ला, VIDEO एकदा पाहाच
ajit pawar
अर्थसंकल्प नव्हे गाजराची पुंगी!
Raj Thackeray
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी केव्हा मिळणार?” अमेरिकेत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर; म्हणाले, “मॅटर्निटी होम…”
jayant patil on maharashtra budget
“चादर लगी फटने, खैरात लगी बटने”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “अत्यंत बेजाबदार…”
why gaurav more left maharashtrachi hasya jatra show
गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम का सोडला? पहिल्यांदाच झाला व्यक्त; म्हणाला, “सलग ५ वर्षे…”
ghatkopar hoarding case
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित
What Sharad Pawar Said About Supriya Sule?
“मोदींपेक्षा जास्त मतं आमच्या सुप्रियाला मिळाली”, शरद पवारांनी मानले बारामतीकरांचे आभार
uddhav thackeray prakash ambedkar (2)
“गरज सरो वैद्य मरो”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; म्हणाले, “तुमचे पक्ष वाचवण्यात…”

“Happy birthday aai, ह्या दिवसाची वाट पहात होते, हे जगातलं सुंदर गिफ्ट आहे जे मला रुद्राज ने दिलय स्वकष्टाने बाबांच्या मदतीने, रुद्राजचं हस्ताक्षर”, असे कॅप्शन नम्रता संभेरावने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : “डोळ्यात लेन्स, लांबलचक दाढी अन्…” ऋषी सक्सेनाने ‘असं’ साकारलं ‘सुभेदार’मधील नकारात्मक पात्र, पाहा व्हिडीओ

दरम्यान नम्रता संभेरावला हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. आज तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये नम्रता साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं. त्याबरोबरच नम्रता ही ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकातही काम करत आहे.