मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अभिनयाबरोबरच प्राजक्ता तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. प्राजक्ताने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे. बन हेअरस्टाइल करत प्राजक्ताने खास लूक केला आहे. प्राजक्ताच्या बोल्ड फोटोशूटवर चाहते लाइक्सचा वर्षाव करत आहेत. परंतु, फोटोपेक्षा पोस्टला दिलेल्या कॅप्शननेच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> Video: घोड्यावर बसून वाजत गाजत आली राणादाची वरात; लग्न मंडपाच्या बाहेरच वऱ्हाडी मंडळींसह हार्दिकचा तुफान डान्स

प्राजक्ताने तिच्या या फोटोंना “सेनोरिटा…जर तुमच्या शरीराची ठेवण योग्य असेल, तर नक्कीच फ्लॉन्ट करा” असं कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ता तिच्या फिटनेसकडे कायमच लक्ष देताना दिसते. अनेकदा योगा करतानाचे फोटो व व्हिडीओही ती शेअर करत असते. या फोटोमधूनही तिने फिटनेसबाबत भाष्य केलं आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सिद्धार्थ जाधवची एन्ट्री; आता कोणता नवा ट्वीस्ट येणार?

हेही पाहा>>Akshya-Hardik Wedding: हातमागावर विणलेली पैठणी, नथ अन् चाफ्याची फुलं; पारंपरिक वेशातील पाठकबाईंच्या मंगळसुत्राने वेधलं लक्ष

‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्राजक्ताने मालिकांबरोबरच मराठी चित्रपटांतही काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress prajakta mali hot photoshoot post seeking attention kak