१ मे हा दिवस सर्वत्र ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जात होता. राजकीय नेत्यांपासून कलाकारांनी पोस्ट करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही महाराष्ट्र दिनानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने मराठमोळा लूक केल्याचं दिसत आहे. हिरव्या रंगाची साडी नेसून प्राजक्ताने त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. दागिन्यांचा साज करत प्राजक्ताने पारंपरिक लूक केला आहे. फोटोसाठी तिने पोझही दिल्या आहेत. मराठमोळ्या वेशातील फोटो शेअर करत प्राजक्ताने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…युगानुयुगे, मनामनात…हाच जयघोष व्हावा… महाराष्ट्राच्या भल्यासाठी हा जन्म कामी यावा..“महाराष्ट्र दिन” आणि ‘कामगार दिनाच्या” खूप शुभेच्छा..“मुंबई- महाराष्ट्रात” बसून हे लिहीताना किती अन् काय काय वाटतय; हे शब्दात मांडू शकत नाही,” असं कॅप्शन प्राजक्ताने या पोस्टला दिलं आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
हेही वाचा>> शरद पवारांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’, प्रतिक्रिया देत म्हणाले, “अंकुश चौधरी…”
प्राजक्ता माळी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याबरोबरच तिने चित्रपट व वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.