‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. नुकतंच प्रियदर्शनीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात एंट्री कशी झाली? याबद्दल विचारणा केली.

प्रियदर्शनी इंदलकर ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच प्रियदर्शनीने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या ऑडिशनबद्दल सांगितले. तसेच तिने तिला ही मालिका कशी मिळाली याबद्दलही भाष्य केले.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
Akshara Singh Death Threat
“५० लाख दे अन्यथा…”, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

“महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी मला बोलवण्यात आलं होतं. पण त्या पर्वात माझी निवड झाली नाही. पण त्यानंतर या कार्यक्रमाचे दिग्दर्शक-निर्माते सचिन गोस्वामी यांनी माझं काम लक्षात ठेवून मला ‘आमच्या हीचं प्रकरण’ या नाटकातील एका भूमिकेसाठी विचारलं.

यानंतर मी पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासाठी ऑडिशन दिले. त्यानंतर माझी निवड झाली. मला हास्यजत्रेच्या मंचाने खूप काही दिलं आहे. या कार्यक्रमाने मला ओळख दिली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या पुण्याईवरच मला पुढची काम मिळाली किंवा अजूनही मिळत आहेत”, असे प्रियदर्शनी इंदलकरने म्हटले.

आणखी वाचा : दीड महिन्यांनी मुंबईत परतलेल्या संकर्षणने घेतला ‘या’ मराठमोळ्या पदार्थाचा आस्वाद, म्हणाला “मध्यरात्री अडीच वाजता…”

“परदेशात राहणाऱ्या अनेक मराठी माणसांपर्यंत माझा चेहरा पोहोचवला. मी फक्त एक कलाकार होते. पण माझ्यातील अभिनेती सचिन गोस्वामी-सचिन मोटे सरांनी घडवली. सुरुवातीला हास्यजत्रेत काम करणं खूप कठीण जायचं. त्यानंतर मी गोस्वामी सरांना सांगितलं की, मला लाऊड अॅक्टिंग जमत नाही. तेव्हा ते म्हणाले होते, लाऊड अभिनय करायचाच नाही. प्रसंग खरेखुरे जग. तेच करण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत करतेय”, असेही ती म्हणाली.

दरम्यान, प्रियदर्शनी इंदलकरने काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. तिचा ‘फुलराणी’ हा चित्रपट बुधवारी २२ मार्चला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ती ‘शांतीत क्रांती’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.