‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत. सध्या हास्यजत्रेतील सर्व कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तेथील सुंदर फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केलेला असाच एक फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा : “माझं पहिलं स्वप्न वेगळं होतं”, सिद्धार्थ जाधवने केला खुलासा; म्हणाला, “इंडस्ट्रीमध्ये येण्याचा विचार…”
हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमबरोबर प्रियदर्शनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेला रवाना झाली. प्रियदर्शनीने न्यूयॉर्क शहरातील स्वत:चा एक सुंदर फोटो सुद्धा शेअर करत त्याला “न्यूयॉर्क शहराने मला खूप आनंदी केले” असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो अभिनेता पृथ्वीक प्रतापने काढलेला आहे. प्रियदर्शनीने शेअर केलेल्या फोटोवर पृथ्वीकसह तिच्या इतर काही चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा : प्रिया बापट – उमेश कामत ९ वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा येणार एकत्र! नव्या नाटकाची घोषणा करत शेअर केली पहिली झलक
प्रियदर्शनी इंदरकरने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप, मिनी स्कर्ट, पांढऱ्या रंगाचे शूज असा सुंदर लूक करत न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फोटोशूट केले. तिच्या फोटोंमध्ये मागे एक व्यक्ती झोपलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच या फोटोवर प्रतिक्रिया देत अभिनेता पृथ्वीक प्रताप म्हणाला, “हे सौंदर्य पाहून एक माणूस मागे चक्कर येऊन पडला.” दुसऱ्या एका युजरने “मागे गटारी सेलिब्रेशन जोरात चाललंय…” तर, आणखी एका युजरने “अमेरिकेतील लोकांना अजून हे सौंदर्य सहन व्हायला वेळ लागेल… त्यामुळे त्यांना ग्लानी येणे स्वाभाविक आहे” अशा कमेंट अभिनेत्रीच्या फोटोंवर केल्या आहेत. एकंदर सर्वांनीच तिच्या या नव्या लूकचे कौतुक केले असून मागे झोपलेल्या माणसाविषयी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ने १७ दिवसांत ओलांडला ५० कोटींचा टप्पा, एकूण कलेक्शन तब्बल…
दरम्यान, हास्यजत्रेच्या अमेरिकेत होणाऱ्या कार्यक्रमांना तेथील प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. अशातच प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कार्यक्रम टीव्हीवर पुन्हा एकदा सुरु करण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे आता पुन्हा हा कार्यक्रम कधी सुरु होतो याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.