छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ला ओळखले जाते. या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणून ओळख मिळवली आहे. या कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवताना दिसतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवाली परबला एकाने लग्नाची मागणी घातली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच शिवाली परबने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे.
आणखी वाचा : Video : प्राजक्ता माळीकडून वनिता खरातला लग्नाची खास भेट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…
शिवालीने हा फोटो शेअर करताना फारच चांगले कॅप्शन दिले आहे. “तकदीर मेरी अब तो तकदीर तुम्हारी है, ज़हां दिल था कभी मेरा तस्वीर तुम्हारी है” असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. तिच्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
तिच्या या फोटोला कमेंट करताना एका चाहत्याने तिला चक्क मागणी घातली आहे. ‘लग्न करशील का माझ्या सोबत’ अशी कमेंट त्या चाहत्याने केली आहे. तर अनेकांनी शिवालीच्या या फोटोवर ती खूप सुंदर दिसते, फार छान अशा विविध कमेंट केल्या आहेत.
दरम्यान शिवाली एक उत्तम अभिनेत्री आहे. हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळवलेल्या शिवालीने चित्रपटांतही काम केलं आहे. ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील तिने दिलेल्या किसींग सीनचीही चर्चा रंगली होती.