प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमांपैकी एक ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आहे. मागील कित्येक वर्षांपासून हास्यजत्रेतील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतं आहे. आता पुन्हा एकदा नव्या हंगामासह हे विनोदवीर प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आजपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमानं प्रेक्षकांचा निरोप घेऊन अमेरिका दौरा केला होता. त्यादरम्यानचे कलाकार मंडळींचे किस्से सध्या चर्चेत आले आहेत.
हेही वाचा – लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळेंचं ‘हे’ आहे कायदेशीर नाव; स्वतः खुलासा करत म्हणाले…
अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही विनोदवीर २३ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. यासंबंधीचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. पण अमेरिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी शिवाली परबचा व्हिसा रिजेक्ट झाला होता. याचा किस्सा तिनं नुकताच सांगितला. शिवाय व्हिसा रिजेक्ट होण्यामागचं मजेशीर कारण पृथ्वीक प्रतापनं सांगितलं.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा हंगाम सुरू होतं असल्यानिमित्तानं ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप आणि शिवाली परब यांनी एका एंटरटेन्मेंट मीडियाशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं होतं की, ‘तुमची सुट्टी कशी गेली?’ यावर शिवाली म्हणाली की, “माझ्या सुट्टीचा पहिलाच महिना व्हिसा करण्यासाठी गेला. माझा पहिला व्हिसा रिजेक्ट झाला होता. मग पुन्हा तिचं प्रोसेस करण्यासाठी पुढचे १५ दिवस गेले.”
हेही वाचा – ‘त्या’ फोटोमुळे भार्गवी चिरमुले झाली होती ट्रोल, नेटकरी म्हणाले होते “मरा सिगारेट पिऊन”
त्यानंतर पृथ्वीकनं शिवालीचा व्हिसा रिजेक्ट होण्यामागचं मजेशीर कारण सांगितलं. तो म्हणाला की, “हिचा व्हिसा रिजेक्ट झाला कारण त्यांनाही कळालं की, महाराष्ट्राचा क्रश शिवाली आहे. तिला महाराष्ट्रातून बाहेर पाठवायला नको म्हणून तिचा व्हिसा रिजेक्ट झाला होता.” पृथ्वीकाच्या या उत्तरानंतर ओंकार, शिवाली जोरजोरात हसू लागले.
दरम्यान, आजपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सुरू होणार असून सोमवार ते गुरुवारी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाची जागा आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार आहे.