आज गुढीपाडवा निमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर गुढी उभारत गुढीपाडवा साजरा केला. तर गेल्या वर्षी अनेक मराठी कलाकार विवाहाबद्ध झाल्याने यंदा अनेक जोडप्यांचा पहिला गुढीपाडवा होता. यातीलच एक म्हणजे अभिनेत्री वनिता खरात. आता तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्याच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री वनिता खरातच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे ती नावारुपाला आली. पण त्याचबरोबरीने मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये काम करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं.

आणखी वाचा : लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा वनिता खरातसाठी असणार खास; नवीन वर्षासाठी केला ‘हा’ संकल्प

वनिताने गेल्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये सुमित लोंढेशी लग्न केलं. तिचं लग्न हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. मोजक्याच नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पण अत्यंत धूमधडाक्यात त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच गुढीपाडवा आहे. वनिताने लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा त्यांनी कसा साजरा केला हे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दाखवलं.

हेही वाचा : मराठी, हिंदीपाठोपाठ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातला खुणावतंय टॉलिवूड; म्हणाली, “मला दक्षिणात्य सिनेसृष्टीत…”

वनिताने लाल रंगाचे काठ असलेली ऑफ व्हाईट रंगाची साडी आज नेसली होती. तर गळ्यात दागिने घातले होते. तर सुमितनेही कुर्ता परिधान केला होता. त्यांच्या घराच्या ग्रीलमध्ये गुढी उभारत त्यांनी गुढीची पूजा केली. आता दोघांच्या या साधेपणाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोंवर कमेंट करत चाहते त्या दोघांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आहेत. तर याचबरोबर त्यांचा हा साधेपणा आवडल्याचंही सांगत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress vanita kharat celebrated her first gudhi padwa after wedding rnv