‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील लोकप्रिय विनोदवीर दादूस म्हणजेच अरुण कदम प्रेक्षकांना खळखळून हसवतात. आपल्या विनोदाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे अरुण कदम सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अरुण आजोबा झाले आहेत. त्यांच्या लेकीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यांचे बाळाबरोबरचे फोटो समोर आले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम झाले आजोबा; लेक सुकन्याने दिला बाळाला जन्म

Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter raha clicks Shaheen Bhatt photo
रणबीर कपूर-आलिया भट्टची दोन वर्षांची लेक झाली फोटोग्राफर! राहाने आई-बाबांचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
मिलिंद गवळी यांनी १०३ वर्षे जुन्या ‘या’ वास्तूला दिली भेट; व्हिडीओ शेअर करीत म्हणाले, “वेगळ्या विश्वात…”
Rishi Sunak's Post From Wankhede Features Father-In-Law Narayana Murthy Google trends
PHOTO: ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सासरे नारायण मूर्तींसोबतचा सेल्फी व्हायरल
Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये विविध प्रकारची पात्रं साकारून अरुण कदम प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. अरुण कदम आता आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी सुकन्याने शनिवारी (१९ ऑगस्ट रोजी) मुलाला जन्म दिला. सुकन्याने बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘मुलगा झाला’ असं कॅप्शन देत तिने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये अरुण कदम यांचाही नातवाबरोबरचा फोटो आहे.

सुकन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे आई-वडील म्हणजेच अरुण कदम व वैशाली कदम तसेच सुकन्याचा पती सागर पोवाळे बाळाला घेऊन उभा आहे. सुकन्याच्या या फोटोवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरनेही फोटोंवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

२०२१मध्ये सुकन्याचं लग्न सागर पोवाळेशी झालं. ती कमर्शिअल आर्टिस्ट व ग्राफिक डिझायनर आहे. शिवाय ती भरतनाट्यमही शिकली आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा ती वडील अरुण कदम यांच्याबरोबर रील्स बनवते.

Story img Loader