छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळाले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा अनेक विनोदवीर प्रसिद्धीझोतात आले आहेत. यातील एक अभिनेत्री म्हणजे चेतना भट. चेतनाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
हेही वाचा- Premachi Goshta: धमाल, मस्ती अन् बरंच काही….; पाहा सागर-मुक्ताच्या लग्नाचा BTS व्हिडीओ
चेतना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. आता नुकतंच चेतनाने नवऱ्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोवरुन ती पतीबरोबर बाहेरगावी फिरायला गेली असल्याचे दिसून येत आहे. हे फोटो शेअर करत तिने ‘मालदीव डायरीज’ अशी कॅप्शनही दिली आहे. चेतना तिच्या पतीबरोबर मालदीवच्या सफारीवर गेली आहे.
आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत चेतना तिच्या नवऱ्याबरोबर वेळ घातवताना दिसत आहे. फोटोमध्ये चेतना व तिचा पती स्विमिंग पूलमध्ये उभे आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. चेतनाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक चाहत्यांनी या फोटोंवर कमेट केली आहे. एवढेच नाही तर वैशाली सामंत, इशाणी डे, सुमित लोंढे यांच्यासह अनेक कलाकारांनीही या फोटोंवर कमेंट केली आहे.
हेही वाचा-
चेतनाच्या नवऱ्याचे नाव मंदार चोळकर आहे. मंदारही मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. त्याने आत्तापर्यंत दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘मितवा’, ‘गुरु’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत.