‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार हा कायमच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून ओंकार भोजने हा ‘करुन गेलो गाव’ या नाटकात काम करताना दिसत आहे. नुकतंच ओंकार भोजनेने त्याच्या क्रशबद्दल भाष्य केले आहे.

ओंकार भोजनेने नुकतंच ‘करुन गेलो गाव’ या नाटकाच्या निमित्ताने ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याच्या सिनेसृष्टीतील क्रशबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने “माझी क्रश अशी कोणीही नाही. पण कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकर हिचा मी चाहता आहे”, असा खुलासा केला.
आणखी वाचा : Video : “तू दूर का, अशी तू दूर का…” भर नाटकादरम्यान ओंकार भोजनेने म्हटली कविता, व्हिडीओ व्हायरल

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती

“माझी क्रश अशी कोणीही नाही. पण कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकर या इन्स्टाग्राम स्टारचा मी खूप मोठा चाहता आहे. ती बिनधास्त, बेधडक अशी मराठी मुलगी आहे”, असे ओंकार भोजने म्हणाला.

“ती माझी क्रश नाही, पण मी तिला फॉलो करतो. तिचा स्वभाव मला आवडतो. ती ज्याप्रकारे रिल्स बनवते, तसेच बिनधास्त कोणत्याही एखाद्या सामाजिक विषयाला उचलून धरते, ते मला फार आवडते. मला तिचा खूप आदर वाटतो. तिचं कामही मला आवडतं. मी प्रेम वैगरे या भानगडीत पडत नाही”, असेही ओंकार भोजनेने म्हटले.

आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान काही महिन्यांपूर्वी ओंकार भोजनेची प्रमुख भूमिका असलेला ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच तो ‘कलावती’ नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रेक्षक नाराज झाले होते. त्याने या कार्यक्रमाला रामराम करत झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ कार्यक्रमात एण्ट्री केली. मात्र हा कार्यक्रमही फार काळ चालला नाही.

Story img Loader