छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेतील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक हास्यवीरांना हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. विनोदवीर दत्तात्रय मोरेही याच शोमुळे घराघरात पोहोचला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दत्तू या नावाने प्रसिद्धी मिळवलेला दत्तात्रय मोरे हास्यजत्रेच्या मंचावर धुमाकूळ घालताना दिसतो. दत्तू त्याच्या दाढीसाठीही प्रसिद्ध आहे. हास्यजत्रेमुळे दत्तूच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दत्तू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने बालपणीचा फोटो शेअर केला आहे. दत्तूचा हा फोटो जवळपास २५ वर्षांपूर्वीचा १९९७ सालातील आहे.

हेही वाचा>> “बहरला हा मधुमास…” गाण्यावरील प्राजक्ता माळीचा रील व्हिडीओ अंकुश चौधरीने केला शेअर, अभिनेत्री कमेंट करत म्हणाली…

हेही पाहा>> Photos: अंबानींच्या मोठ्या सुनेचं मॅटर्निटी फोटोशूट, श्लोका अंबानीने फ्लाँट केलं बेबी बंप, पाहा फोटो

‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेच्या निमित्ताने दत्तूने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला “पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वाहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा,” असं कॅप्शन दिलं आहे. दत्तूच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. “दत्तू तू आज पण तसाच क्यूट आहेस. जसा या फोटोमध्ये आहेस”, असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “तुम्ही लहानपणापासून खूपच क्यूट आहात”, अशी कमेंट केली आहे.

“फक्त दाढी आलीये, बाकी दत्तू आहे तसाच आहे,” अशी कमेंट केली आहे. “बघा रे लहान दत्तूला दाढी नाहीये” असंही एकाने म्हटलं आहे.

एकाने “तेव्हा पण दाढी होती वाटतं” अशी कमेंट केली आहे. “दादा तुला लहानपणापासूनच दाढी आहे, ” असंही एकाने म्हटलं आहे.

दत्तूचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या दत्तू हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame dattu more shared childhood photo netizens react kak