‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे त्याच्या उत्तम अभिनयासाठी आणि कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. दत्तू दीड महिन्यांपूर्वी २३ मे रोजी लग्नबंधनात अडकला. त्याने अगदी गुपचूप लग्न उरकलं होतं. त्याच्या पत्नीचं नाव स्वाती घुनागे आहे. दत्तू व स्वातीचा प्रेमविवाह आहे, पण या लग्नाला दोघांच्याही घरून विरोध झाला होता, असा खुलासा त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बाळासाहेबांचं ते स्वप्न अपूर्णच”, नितीन गडकरींचा खुलासा; म्हणाले, “त्यांच्या निधनाआधी मी रुग्णालयात भेटल्यावर…”

दत्तू म्हणाला, “आम्ही एकमेकांना चार वर्षांपासून ओळखत होते, प्रेमाची कबुली दिल्यानंतर घरी सांगायचं कसं हा मोठा प्रश्न होता. आम्हा दोघांचं प्रोफेशन पूर्णपणे वेगळं होतं. स्वातीच्या बाबांना डॉक्टर जावई हवा होता. घरात सगळे डॉक्टर असल्याने जावई डॉक्टरच असावा अशी त्यांची अपेक्षा होती. त्यात माझ्याही घरी प्रेमविवाह करायचाय हे कसं सांगू कळत नव्हतं. मी आईला घाबरून होतो आणि घरातले लवकर तयार होणार नाहीत, अशी कल्पना होती. मी थोडी शक्कल लढविली, मी बहिणींना आधी सांगितलं आणि आईची मनधरणी करायचं ठरवलं. तिने नाहीच म्हटलं तरी हळूहळू मागे लागून तिचा होकार मिळवू, पण आईला कळल्यावर तिने नकार दिला. पण बहिणींनी मदत केली व दोन-तीन महिन्यांनी आई तयार झाली.”

72 Hoorain: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला चित्रपट, कमावले फक्त ‘इतके’ लाख रुपये

स्वातीच्या घरून नकार होता, पण दत्तूने तिच्या वडिलांची भेट घेतली आणि मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. “मी तिच्या घरी गेलो आणि तिच्या बाबांना भेटू अपेक्षा विचारल्या. मला कोणतंच व्यसन नाही, मी प्रॉडक्शन आणि अभिनय दोन्ही करतो. त्यामुळे मी काहीच कमवणार नाही, असं नाहीये. मी आताही कमवतोय आणि आयुष्यात पुढे जास्तच कमवेन, कारण माझीही स्वप्नं आहेत. त्यांना माझ्या गोष्टी पटल्या आणि त्यांनी लग्नासाठी होकार दिला,” असं दत्तूने ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

“लग्नासाठी कुटुंबियांनी होकार दिला नसता तर पळून जाऊन कोर्ट मॅरेज केलं असतं. त्यासाठी कोर्टाची तारीख घेऊन ठेवली होती. खरं तर तसं केलं नसतं, दोन्ही कुटुंबियांच्या मर्जीनेच आम्हाला लग्न करायचं होतं. त्यात स्वाती एकुलती एक आहे, आईवडिलांच्या इच्छा असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलून त्यांची मनधरणी करून लग्नासाठी होकार मिळवण्याचाच आमचा प्रयत्न होता,” असंही दत्तू व स्वातीने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame dattu more swati ghunage love story family opposed wedding hrc
Show comments