अफलातून अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना पोट धरुन हसवणारा दत्तू मोरे हास्यजत्रेतील लाडका विनोदवीर आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून दत्तू घराघरात पोहोचला. स्किटमधील त्याचा निरागसपणा प्रेक्षकांना विशेष भावला. काही दिवसांपूर्वीच दत्तूने लग्नबंधनात अडकून त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली.

दत्तूने २३ मे रोजी स्वाती घुनागे हिच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचा त्यांचा वटपौर्णिमा हा पहिलाच सण आहे. दत्तूची पत्नी स्वातीने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. स्वातीने पहिल्या वटपौर्णिमेचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. लग्नानंतरच्या पहिल्याच वटपौर्णिमेसाठी स्वातीने खास हिरव्या रंगाची साडी नेसत पारंपरिक लूक केला होता.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Marathi Actress Hemal Ingle Wedding photo
साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल इंगळेने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ! पती आहे कलाविश्वापासून दूर…; फोटो आले समोर
Ileana DCruz expecting second baby
Video: लग्नाआधीच प्रेग्नेन्सीमुळे राहिली चर्चेत, ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई? ‘तो’ फोटो व्हायरल
Lakshmi Niwas Fame Divya Pugaonkar marriage invitation card
‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरची लगीनघाई! शेअर केली लग्नपत्रिकेची खास झलक, २०२१ मध्येच पार पडलेला तिलक समारंभ

हेही वाचा>> जेव्हा अमिताभ बच्चन यांना डॉक्टरांनी केलेलं वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित, जया बच्चन यांनी हातात हनुमान चालीसा घेतली अन्…; नेमकं काय घडलं होतं?

स्वातीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना दिसत आहे. स्वातीने अगदी पारंपरिक पद्धतीने पूजा करत पहिली वटपौर्णिमा साजरी केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंना स्वातीने “पहिली वटपौर्णिमा” असं कॅप्शन दिलं आहे.

दत्तू व स्वातीने कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. दत्तूच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Story img Loader