छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. मागील कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. ज्याप्रमाणे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे चाहते आहेत, त्याप्रमाणे या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीरांचा सुद्धा एक वेगळा चाहतावर्ग आहे. त्यामुळे अमेरिका दौऱ्यानंतर हा कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. १४ ऑगस्टपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या हंगाला जोरदार सुरुवात झाली आहे. अशातच या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे आणि पृथ्वीक प्रतापच्या एका खास नात्याचा खुलासा झाला आहे. गौरवनं एका मुलाखतीदरम्यान दोघांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “…स्टार किड्स वगैरे काही नसतं”; प्रिया बेर्डेंनी सांगितला इंडस्ट्रीतला धक्कादायक अनुभव, म्हणाल्या, “अभिनयला…”

‘स्टार मीडिया मराठी’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत देताना गौरवनं पृथ्वीकबरोबर असलेल्या खास नात्याबद्दल सांगितलं. त्याच्या जिगरी मित्राचा सख्खा भाऊ पृथ्वीक असल्याचा खुलासा गौरवानं केला. जुन्या आठवणी सांगत गौरव म्हणाला की, “कॉलेजमध्ये असताना माझी पडद्याआड एकांकिका गाजली होती. त्यानंतर आम्ही दुसऱ्या वर्षात असताना एकांकिका स्पर्धा बघायला गेलो होतो. तर याच्या (पृथ्वीक) कॉलेजची एकांकिका सुरू होती. मग मी याला एका कोपऱ्यात खूप वळवळ करताना पाहिलं. त्यावेळेस हा खूप बारीक होता. त्यानंतर मी माझ्या मित्रांना म्हटलं, तो शेवटचा पोरगा आहे, तो खूप भारी काम करतो. त्याला काहीतरी करायचं आहे, पण तो खूप मागे आहे. तेव्हा हा खूप गर्दीत मागे बसलेला.”

हेही वाचा – ‘सुभेदार’ चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे झळकणार ‘या’ भूमिकेत; पहिला लूक आला समोर

“मग आम्ही दोघं सगळं झाल्यानंतर भेटलो. त्यावेळेस मी याला म्हटलं, तू काम मस्त करतोस. तुला पुढे यायचं आहे, पण तुला तसं काम मिळत नाहीये. त्यानंतर हा (पृथ्वीक) म्हणाला, दादा मी तुला एक बोलू का? मी तुला ओळखतो. मग मी म्हटलं, थँक्यू. तेव्हा हा म्हणाला, मी तसं ओळखत नाही. तू माझ्या घरचा आहेस. मी म्हटलं, घरचा? म्हणजे? त्यावर हा म्हणाला, तू प्रतिक दादाचा मित्र आहेस ना? मी म्हटलं, हो.”

हेही वाचा – क्षिती जोगचं फेसबुक पेज हॅक; अकाउंटवरून अश्लील व्हिडीओ झाले शेअर, अभिनेत्री म्हणाली…

“त्यानंतर मला कळालं माझा जिगरी मित्र प्रतिकचा हा सख्खा भाऊ आहे. तेव्हा मी याला म्हटलं, तू इकडे ये रे. तू प्रतिकचा भाऊ आहेस? हा म्हणाला, हा. मग मी म्हटलं, तू घोळक्यात काय करतोय? तू प्रतिकचा भाऊ म्हणजे आपला भाऊ. तू आता प्रमुख भूमिका करणार. मी सहज भावाच्या प्रती बोललो. पण नंतर ‘जजमेंट डे’ नावाची आम्ही एकांकिका करत होतो. त्याचे मी तीनच प्रयोग केले होते आणि मग मला दामले सरांबरोबर नाटकं मिळालं. त्यावेळेस प्रसाद खांडेकर म्हणाला की, मला एक पोरगा दे. जो तुझ्यासारखं काम करेल. मग मी म्हटलं, माझ्या एक नजरेत पोरगा आहे. आपल्या प्रतिकचा भाऊ. तर तो म्हणाला, मी त्याचं काम फारस पाहिलं नाही. मी म्हटलं, ट्राय तर कर. मी सांगतो ना. मग पीपी (पृथ्वीक प्रताप) आला आणि पीपीनी ती एकांकिका वाजवली,” अशा जुन्या आठवणींना गौरवनं उजाळा देत पृथ्वीकबरोबरच्या खास नात्याबद्दल सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame gaurav more and prithvik pratap between special relationship know pps
Show comments