‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याची स्टाइल, त्याचं बोलणं हे प्रेक्षकांचा खूप आवडतं. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा गौरवचा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. या डायलॉगबरोबर गौरवची होणारी एन्ट्री त्याच्या केसांमुळे हिट ठरते. विनोदी शैलीबरोबरच त्याची केसांची हेअरस्टाईल खूप लोकप्रिय आहे. असा प्रसिद्ध गौरव नेहमी चर्चेत असतो. सध्या गौरवचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – Video: “ही पागल होत चालली आहे…” राखी सावंतच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
ऑक्टोबर महिना हा गौरव मोरेसाठी खूप खास आहे. कारण एकाच महिन्यात त्याचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कालच त्याचा ‘अंकुश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर २० ऑक्टोबरला ‘बॉईज ४’ आणि २७ ऑक्टोबरला ‘लंडन मिसळ’ हे दोन गौरवचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. शिवाय गौरव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणावर आधारित असलेला ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटातही झळकणार आहे.
हेही वाचा – एका शब्दामुळे गौरव मोरेला अडवलं होतं विमानतळावर; पार्थ भालेरावने सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान, गौरवच्या ‘बॉईज ४’ या चित्रपटाचा काल ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील गौरवच्या शुद्ध भाषेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पार पडले. यावेळी गौरवने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या शाहरुख खानच्या चित्रपटातील एका गाण्यावर व्हिडीओ केला. गौरवचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये गौरव ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील ‘हो गया है तुझको तो प्यार सजना’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसेच गाण्यातील लाल रंगाच्या बसमध्ये शाहरुख ज्याप्रमाणे दिसला आहे, त्याचप्रमाणे गौरवने हे गाणं रिक्रिएट केलं आहे.
हेही वाचा – “आज अचानक पॅकअप नंतर…” प्रसाद ओक याला चाहत्यांनी दिला आश्चर्याचा धक्का, अनुभव सांगत म्हणाला…
हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी मालिकेच्या सेटवर २ ते ४ काय करते? पाहा…
गौरवच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहते प्रतिक्रिया देत आहेत. “आपला मराठी कॉमेडी किंग”, “आपला शाहरुख भाई”, “टी-शर्ट आणि बसचा कलर मॅचिंग झाला आहे”, “बोहत हार्ड”, अशा प्रतिक्रिया गौरवच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.