छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमातील विनोदवीरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच शोमधून हास्यवीर गौरव मोरेलाही प्रसिद्धी मिळाली. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेला गौरव प्रेक्षकांना त्याच्या अफलातून विनोदबुद्धीने पोट धरुन हसायला भाग पाडतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरव सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी चित्रपट, भूमिका याबद्दल गौरव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असतो. नुकताच गौरवने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याचा दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला होता. मुंबईच्या रस्त्यावरील गौरवचा या फोटोमध्ये त्याने पांढरे टी शर्ट घातले आहे. झुपकेदार केस नसलेला आणि नुकतीच दाढी मिशी फुटलेल्या गौरवचा हा फोटो २०१२ वर्षातील आहे. या फोटोला त्याने २०१२ चा फोटो असं कॅप्शन दिलं होतं.

हेही वाचा >> “किसिंग सीन करताना…” ‘३६ गुण’ चित्रपटातील ‘त्या’ बोल्ड दृश्यांबद्दल संतोष जुवेकरचा खुलासा

(फोटो : गौरव मोरे/ इन्स्टाग्राम)

हेही वाचा >> “पत्नीचा फोन उचलला नाही तर…” जया बच्चन यांच्या रागीट स्वभावाबद्दल अमिताभ बच्चन यांचा खुलासा

गौरवने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. अनेक विनोदी कार्यक्रमांत काम केल्यानंतर त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये संधी मिळाली. या संधीचं गौरवने सोनं केलं. आज फिल्टरपाड्याचा बच्चन संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

हेही पाहा >> Photos : ‘या’ अभिनेत्रीमुळे शोएब मलिक आणि सानियाच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांनंतर फोटो झाले व्हायरल

विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने अभिनयाची छाप पाडली. यामुळेच त्याला चित्रपटातही काम करण्याचीही संधी मिळाली. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या हवाहवाई चित्रपटात तो सिद्धार्थ जाधवसह स्क्रीन शेअर करताना दिसला. त्यानंतर आणखी एका चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त गौरव लंडनलाही जाऊन आला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared his 10 years old photo kak