‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. गौरव त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन खास पोस्ट शेअर केली आहे.
६ डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत गौरवने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या फोटोला त्याने “महामानवास त्रिवार अभिवादन” असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा>>‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता सोशल मीडियावर मागतोय नोकरी; बायोडेटा शेअर करत म्हणाला…
गौरवने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. तर एका चाहत्याने “दादा, तू प्रत्येक वेळेस मन जिंकतोस” अशी कमेंट करत गौरवचं कौतुक केलं आहे.
हेही पाहा>> Photos: साडी, अंबाडा, नथ व कपाळावर कुंकू; शरद पोंक्षेंच्या स्त्री वेशातील व्हायरल फोटोमागील सत्य काय?
‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी ओळख मिळवणारा गौरव त्याच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. गौरवने मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ या चित्रपटात तो झळकला होता. त्यानंतर एका चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त गौरव लंडनलाही गेला होता.