अनेक मालिकांमध्ये काम करुन अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मालिकेमुळे नम्रता घराघरात पोहोचली. विनोदाची उत्तम जाण व अभिनयाच्या जोरावर तिने मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. नम्रता ‘गेमाडपंथी’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गेमाडपंथी’ या वेब सीरिजच्या निमित्ताने नम्रताने नुकतीच ‘मराठी धमाल’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत नम्रताबरोबर रॅपिड फायर हा खेळ खेळण्यात आला. या खेळात नम्रताला काही प्रश्न विचारण्यात आले. या सगळ्याच प्रश्नांना नम्रताने अगदी झटपट उत्तरे दिली. नम्रताला या रॅपिड फायरमध्ये “गौरव मोरे की ओंकार भोजने?” असा प्रश्न विचारण्यात आला.

हेही वाचा>> छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करण्याची राज ठाकरेंची इच्छा, म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला…”

नम्रताने वेळ न दवडता या प्रश्नाचं “ओंकार भोजने” असं उत्तर दिलं. पुढे ती म्हणाली, “ओंकार भोजनेला मी भाऊ मानलं आहे. तो माझा भाऊ आहे. त्याच्याबरोबर माझं वेगळंच कनेक्शन आणि बॉण्डिंग आहे. अगं आगं आई आणि चांदनी कपूर या त्याच्याबरोबरच्या माझ्या दोन सीरिज होत्या. माझ्या काही फेव्हरेट सीरिजपैकी या सीरिज आहेत. अगं अगं आईमध्ये ओंकार माझा मुलगा होता. ते पात्र मी खूप मनापासून करायचे. ओंकार भोजने ग्रेट आहे. तो एक उत्तम कलाकार आहे.”

हेही वाचा>> “माझे आजोबा, माझे हिरो”, आजोबांच्या निधनानंतर आलिया भट्टची भावुक पोस्ट, म्हणाली, “शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी…”

नम्रता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिने ‘अवघाचि संसार’, ‘वादळवाट’ या मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘गेमाडपंथी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao praises onkar bhojane kak