परदेशवारी झाल्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून हास्यजत्रेचं नवं पर्व सुरू झालं. त्यानिमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार पुन्हा चर्चेत आले आहेत. अशातच हास्यजत्रेमधील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव सासूबाईचं कौतुक करताना पाहायला मिळाली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्री नम्रता संभेराव नेहमी चर्चेत असते. नम्रताने अचूक विनोदी शैलीमुळे आणि सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. अलीकडेच तिने ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिने सासूचं कौतुक केलं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

नम्रता संभेराव म्हणाली, “माझ्या सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही. माझ्या आयुष्यात सासू असल्यामुळे माझं काम सुरळीत पार पडतंय. सगळं व्यवस्थित चालू आहे.”

पुढे अभिनेत्री म्हणाली की, आपण म्हणतो, दोन पायावर असल्यामुळे व्यवस्थित चालतो. एखाद्या पायाला जरी दुखापत झाली तरी प्रोब्लेम होतो. तसंच माझी सासू माझा एक पाय आहे आणि माझा स्वतःचा दुसरा पाय आहे. माझ्या सासूमुळे मी खूप काम करू शकते. कारण पूर्ण वेळ रुद्राज त्यांच्याबरोबर असतो. मला त्याला पूर्णवेळ देता येत नाही. त्यामुळे ती त्याची यशोदा आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

दरम्यान, नम्रता संभेरावच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिच नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात नम्रता संभेरावर पाहायला मिळणार आहे. या नाटकात नम्रतासह प्रसाद खांडेकर, शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर दिसणार आहे. २१ डिसेंबरपासून ‘थेट तुमच्या घरातून’ नाटक रंगभूमीवर येणार आहे.

हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…

याआधी नम्रता परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं धुमा’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकली होती. या चित्रपटात नम्रता मुक्ता बर्वे, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये यांच्यासह पाहायला मिळणार होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेच खूप कौतुक झालं. तसंच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Story img Loader