परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते अशी मराठीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट १ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित झालं; जे सध्या युट्यूब म्युझिकवर ट्रेडिंग होतं आहे. या गाण्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींनी व्हिडीओ केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. यावेळी या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेराव, प्राजक्ता माळी, वनिता खरात आणि चेतना भट या चौघींनी ‘नाच गं घुमा’ या गाण्यावर व्हिडीओ केला. नम्रताने तिच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: आलिया भट्ट-रणबीर कपूरने वांद्रे येथील नव्या आलिशान घराची केली पाहणी, किंमत वाचून व्हाल थक्क

“आम्ही बाई घुमा आम्ही बाई घुमा…ऑस्ट्रेलियात वेगवेगळे कपडे घालून घुमा (यमक जुळवण्याच्या धडपडीसाठी माफ करा),” असं कॅप्शन लिहित नम्रताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “क्या बात है.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “लेडीज गँग जिंदाबाद.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खूप छान.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अरे एकदम कडक.”

हेही वाचा – Video: फुलांचा वर्षाव, भन्नाट उखाणा अन्…, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम तितीक्षा तावडेचा सासरी ‘असा’ झाला गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ हे गाणं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंतने गायलं आहे. तसंच हे गाणं परेश मोकाक्षी यांनी लिहिलं आहे. याशिवाय या गाण्यातील नृत्यदिग्दर्शनाची भूमिका राहुल ठोंबरेने सांभाळली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao prajakta mali chetana bhat vanita kharat video on naach ga ghuma song pps