‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरात पोहोचली आहे. आपल्या विनोदी शैलीमुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून आज तिचा लेक रुद्राजचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने नम्रताने सोशल मीडियावर रुद्राजचे काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री नम्रता संभेरावने या पोस्टमध्ये रुद्राज आणि तिच्यामधील गमतीशीर संवाद लिहिले आहेत. अभिनेत्रीने लिहिलं आहे की,

Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

मी: वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा रुद्राज, खूप मोठा हो
रुद्राज: आई तू पण मोठी हो
मी : रुद्राज तू आता ५ वर्षांचा झालास म्हणजे खूप मोठा झालास
रुद्राज: पण मग आई मला शिडी का लागते चढायला?
मी : हो पण तुझा ब्रेन तर शार्प होणार रुद्राज भारी नं !!
रुद्राज : पण आई पेन्सिलच्या टोकाएवढा शार्प का?

पुढे नम्रताने लिहिलं आहे, “तुझ्या अशा अनेक प्रश्नांनी मी निरुत्तरित होते आणि मला अभिमान सुद्धा तितकाच वाटतो. कारण माझं बाळ जगातलं सगळ्यात निरागस बाळ आहे. माझं गोंडस लेकरू, आय लव्ह यू. आई तू माझी फेवरेट आई असतेस हे वाक्य रोज कानावर पडतं. मला स्पेशल फील करून देण्याबद्दल खूप थँक्स रुद्राज,” अशा अनोख्या अंदाजात अभिनेत्रीने लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगनंतर ईशा अंबानीच्या होळी पार्टीची चर्चा; माधुरी दीक्षितसह देसी गर्लचा हटके अंदाज व्हायरल

नम्रताच्या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी तिच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, नम्रता ही रुद्राजचे नेहमी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. रुद्राचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते.

Story img Loader