‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या कार्यक्रमातील असंख्य स्किट सोशल मीडियावर व्हायरल होतात. हास्यजत्रेची कोहली फॅमिली प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या स्किटवरून मध्यंतरी एक रॅप गाणंही बनवण्यात आलं होतं. नम्रता संभेरावने या स्किटच्या आठवणींना उजाळा देत एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हास्यजत्रेतील ‘कोहली’ कुटुंब प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. कोहली कुटुंबाच्या स्किटमध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव, प्रियदर्शनी इंदलकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा : “आम्हीच नंबर १”, TRP च्या चुकीच्या बातम्यांबद्दल जुई गडकरीने मांडलं मत; म्हणाली, “आम्हाला चॅनेलकडून…”
हास्यजत्रेच्या नव्या पर्वाला अलीकडेच सुरूवात झाली आहे. अशातच नम्रता संभेरावने ‘कोहली’ फॅमिलीचा फोटो शेअर केल्याने हे स्किट नव्या रूपात पुन्हा सादर होणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. अभिनेत्रीने कोहली फॅमिलीचा फोटो शेअर करत याला, “आमची कोहली फॅमिली समीर चौघुलेंशिवाय अपूर्ण आहे.” असं कॅप्शन दिलं आहे. शिवाली अवली कोहली, बिवाली अवली कोहली, पावली अवली कोहली, अवली लवली कोहली अशी या स्किटमधील व्यक्तिरेखांची भन्नाट नावं आहेत.
हेही वाचा : “भर पार्टीत शाहरुख खानने माझा हात धरला अन्…” गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली…
दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आमची सगळ्यात आवडती सीरिज”, “सगळ्या स्किटमध्ये ही सीरिज कायम लक्षात राहणार”, “हास्यजत्रा या स्किटशिवाय अपूर्ण…” अशा कमेंट्स नम्रताने शेअर केलेल्या फोटोवर करण्यात आल्या आहेत.