‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव हिनं आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री उत्तम अभिनयाबरोबरच उत्तम गातेही. तिनं सोशल मीडियावर अनेकदा गातानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या आवाजाचं चाहत्यांकडूनही कौतुक झालं आहे. पण, नम्रताला ज्या व्यक्तीमुळे गाता येतं त्या व्यक्तीसाठी तिनं एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री नम्रता संभेराव ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिनं नुकतीच मोठ्या बहिणीसाठी एक पोस्ट लिहिली आहे. मोठ्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्तानं नम्रतानं लिहिलं आहे की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई. ही माझी मोठी बहीण आहे. माझ्या आयुष्यात पहिला आदर्श कोण असेल तर मला वाटतं माझी ताई आहे.”

हेही वाचा – Video: अभिनेत्री तेजश्री प्रधानने चाहत्यांसाठी दिली खुशखबर, लवकरच….

“दिसायला देखणी, गोरीपान, लांबसडक केस आणि पारदर्शक स्वभाव असलेली माझी ताई उत्तम गातेसुद्धा. मला जे काही थोडं फार गाता येतं ते ताईमुळे. तिचं गाणं ऐकून ऐकून मलाही गाणं कळलं थोडं फार, पण तिच्या इतकं नक्कीच नाही. सगळ्यांचा विचार करणारी, मनमोकळं हसणारी माझी ताई, उत्तम आई, सून, बायको, शिक्षिका तर आहेच, पण उत्तम माणूसही आहे. ताई मला तुझ्याकडून खूप प्रेरणा मिळते आणि माझं आदरयुक्त प्रेम ही तुझ्यावर खूप आहे. ईश्वराचे आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहो”, अशी खास पोस्ट नम्रतानं तिच्या मोठ्या बहिणीसाठी लिहिली आहे.

हेही वाचा – Video: “नवरा दुसऱ्या मुलींबरोबर…” अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या ‘त्या’ रीलवर नेटकऱ्याची कमेंट, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या…

नम्रताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही तिच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यापूर्वी नम्रतानं तिच्यासाठी स्पेशल चहा बनवणाऱ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ शेअर केला होता; जो चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अभिनेत्री भार्गवी चिरमुले नम्रतासाठी स्पेशल चहा बनवताना दिसली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao shares special post for elder sister pps