महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नम्रता संभेराव नेहमी चर्चेत असते. विनोदी शैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या आवाजानेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. नम्रताने नुकताच अंगाई गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहत्यांकडून तिच्या आवाजाचे कौतुक केले जात आहे.

नम्रता संभेरावने ‘निज निज रे बाळा’ ही अंगाई गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि लिहिलं, ‘ही एक पारंपरिक अंगाई आहे. खूप पूर्वी ऐकली होती, तेव्हापासून रुद्राजला झोपवताना मी ही अंगाई ऐकवते. समस्त आयांना समर्पित.’

rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Story About Manavat Murder Case
Manavat Murders : महाराष्ट्राला हादरवणारं मानवत हत्याकांड नेमकं होतं काय?
: Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? आता सीआयडी करणार तपास!
dispute on vasant kanetkar literature copyright
प्रा. वसंत कानेटकर लिखित अप्रकाशित संहितेच्या हक्कावरुन वाद
International Microorganism Day Marathwada and Maharashtra need to get rid of harmful chemical farming
आता मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतीसाठी ‘जैविक संग्राम’ हवा!
women killed by daughter in Khalapur raigad
रायगड: प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसलेल्या मुलीनेच आईची केली हत्या
Rumors of army recruitment upset youths crowds in Devalali
सैन्य भरतीच्या अफवेने तरुणांना मनस्ताप, देवळालीत गर्दी

हेही वाचा – “आगाऊपणा बघा, तोंड उघडता येत नसले तरी…”; दीप अमावस्येबद्दल केतकी चितळेने केलेली पोस्ट चर्चेत

हेही वाचा – Video : “…अन् त्या एका मिनिटात मी १७ हजार वेळा मेले”, क्रांती रेडकरनं सांगितला अनुभव

नम्रताच्या आवाजात ही अंगाई ऐकून एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, ‘वा! काय आवाज आहे. सुरुवातीला मला वाटलं कुठल्या तरी भयपटाचा सीन आहे की काय? बाकी अंगाई गीत खूप छान.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलंय, ‘किती सुंदर गातेस नमाताई. खूप सारं प्रेम.’ तसेच तिसऱ्यानं लिहिलंय, “याच गीताचं मी ऐकतं आलेलो व्हर्जन निराळं आहे. ‘बा निज गडे निज गडे लडिवाळा.. निज निज माझ्या बाळा.. सुतार उत्तमसा तुजसाठी आणविला.. पाळणा सुबक सजविला.. चहुबाजूंनी राघु मोर जडविले.. पाळण्यात तुज निजविले…’ “

हेही वाचा – “उगाचच कुणाच्यातरी पदरी…”, ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर दिग्दर्शक विजू मानेंचे वक्तव्य

दरम्यान, या अंगाईपूर्वी नम्रताने ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’ हे गाणे गातानाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. अभिनेत्रीच्या या व्हिडीओनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.