‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. कलाकारांना या कार्यक्रमाने नवी ओळख मिळाली. प्रेक्षक या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांवर भरभरून प्रेम करत असतात. यापैकीच एक म्हणजे निखिल बने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून निखिल नावारूपाला आला. तर आता त्याने त्याची क्रश कोण हे सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “कार्यक्रमात माझ्या जाडेपणाबद्दल विनोद केले तर…”, विशाखा सुभेदार स्पष्टच बोलल्या, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं उदाहरण देत म्हणाल्या…

निखिलचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियावर सक्रिय राहून निखिल त्याच्या आयुष्यातल्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. याबरोबरच अनेक मुलाखतींमधून देखील तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर करत असतो. तर आता त्याने त्याची क्रश कोण आहे हे सांगितलं आहे.

हेही वाचा : “त्याने मला प्रपोज केलं आणि…,” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने केला मोठा खुलासा

निखिलने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात त्याने त्याच्या खाजगी आयुष्यबद्दल चाहत्यांना माहीत नसलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तर यामध्ये त्याने त्याच्या क्रशचं नावही सांगितलं. क्रशबद्दल प्रश्न विचारताच त्याने लाजत त्याची क्रश अभिनेत्री पूजा सावंत आहे असं सांगितलं. त्यामुळे आता निखिलने दिलेले हे उत्तर चर्चेत आलं आहे.