‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे महाराष्ट्रभरात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता प्रेक्षकांना खळखळून हसवतो. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. यापैकी एक अभिनेता म्हणजे निखिल बने. निखिल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. अभिनेता खऱ्या आयुष्यामध्येही अगदी साधा आणि उत्तम व्यक्तिमत्त्व असलेला कलाकार आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने त्याच्या चाळीमधील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निखिल बनेने चाळीतल्या सत्यनारायण पूजेची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेता राहत असलेल्या चाळीत नुकतंच सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. निखिल हास्यजत्रेमुळे घराघरांत लोकप्रिय झाला आहे. नुकतीच त्याने ‘बॉईज ४’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. एवढी प्रसिद्धी मिळवूनही निखिल बने आजही भांडूपमध्ये एका चाळीत राहतो.

हेही वाचा : “प्रजासत्ताक दिनी इंग्रजी गाणी, डीजेचा तडका अन्…”, मराठी दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट; म्हणाले, “डोळ्यांत पाणी…”

निखिल व त्याच्या सर्व शेजाऱ्यांनी मिळून सत्यनारायण पूजेसाठी खास चाळ संस्कृतीची झलक दाखवणारा देखावा बनवला होता. चाळीत पूजा पार पडल्यावर सगळ्यांनी रात्री एकत्र बसून देवाचं भजन गायलं. पुढे अभिनेत्याच्या चाळीत मौजमजेसाठी विविध खेळ रंगले. या सगळ्या गोष्टी निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : “ही साधी गोष्ट कधी कळणार?” नाट्यगृहातील अस्वच्छता पाहून प्रिया बापटचा संताप, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, निखिल बनेने शेअर केलेला व्हिडीओ पाहून सध्या त्याच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक करण्यात आहे.”सत्यनारायण महापूजा २०२४, सुस्वर भजन!” असं कॅप्शन अभिनेत्याने या व्हिडीओला दिलं आहे. “खूप सुंदर”, “तुम्ही डेकोरेशन कुठून घेतलं” अशा असंख्य प्रतिक्रिया बनेच्या चाहत्यांनी त्याला कमेंट्समध्ये दिल्या आहेत.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame nikhil bane shares chawl video of satyanarayan pooja sva 00