‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांना प्रेक्षकांची अल्पावधीतच पसंती मिळाली आहे. हास्यजत्रेच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेता निखिल बनेला सुद्धा या कार्यक्रमामुळे एक वेगळी ओळख मिळाली. तो ‘बॉईज ४’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. याशिवाय लवकरच अभिनेता छोट्या पडद्यावरील मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीने पुण्यात सुरू केलं नवीन हॉटेल, नावही ठेवलंय खास, पाहा पहिली झलक

Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
zee marathi paaru serial purva shinde aka disha re enters in the show
‘ती’ पुन्हा आली! ‘पारू’ मालिकेत जुन्या खलनायिकेची रिएन्ट्री, लग्नमंडपात येणार अन्…; पाहा जबरदस्त प्रोमो
Lakhat EK Aamcha Dada
‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ स्पर्धेत डॅडी आणि सूर्या समोरासमोर येणार, ‘लाखात एक आमचा दादा’मधील डॅडी म्हणाले, “निंबाळकर घराण्याच्या इज्जतीचा…”
madhuri dixit praises hemant dhome fussclass dabhade movie
“हृदयस्पर्शी कथा…”, माधुरी दीक्षितकडून ‘फसक्लास दाभाडे’चं कौतुक, सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत ‘धकधक गर्ल’ म्हणाली…
Marathi Joke On Husband Wife
हास्यतरंग : कशी दिसतेय मी नवरोबा…

अभिनेता निरंजन कुलकर्णीने सोमवारी निखिल बनेसह फोटो शेअर केल्याने बने ‘आई कुठे काय करते’ मालिकेत एन्ट्री घेणार असल्याच्या सोशल मीडियावर रंगल्या होत्या. परंतु, निखिलने नव्या मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला. ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ या नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेत निखिल बने महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : रेखा, बस नाम काफी है!

निखिल बने याने ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ या मालिकेच्या सेटवरचा खास व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. मालिकेच्या सेटवरच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये निखिलने एका हाताला पट्टी बांधल्याचं आणि अंगावर घोंगडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. निखिल मालिकेत केव्हा एन्ट्री घेणार? त्याची भूमिका काय असेल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : Video: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अधिपतीने बायकोचं नाव काय ठेवलं? पाहा

nikhil bane
निखिल बने

दरम्यान, ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ ही मालिका ३ ऑक्टोबरला सोनी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेचं कथानक सहा महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. मालिकेत या सहा महिला पुरुषांचा तिरस्कार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता ही मालिका सोनी मराठीवर प्रसारित केली जाते. या स्त्रीप्रधान मालिकेचं लेखन श्वेता पेंडसे आणि रोहिणी निनावे यांनी केलं आहे.

Story img Loader