छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. अनेक कलाकारांना या शोमुळे प्रसिद्धी मिळाली. अभिनेता निमिश कुलकर्णीही या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. निमिश हास्यजत्रेत अधून मधून दिसत असला तरी त्याच्या विनोदी अभिनयाने तो प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निमिश आता लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत वैभव हे पात्र साकारणारा अभिनेता अमेय बर्वे याने मालिकेला रामराम ठोकला होता. आता अमेयच्या जागी मालिकेत निमिश वैभव हे पात्र साकारताना दिसणार आहे. निमिशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

हेही वाचा>>सलमान खान बॉडीगार्ड शेराच्या मुलाला करणार लॉन्च; टायगरसाठी अभिनेत्रीच्या शोधात

“नमस्कार मंडळी…आजपर्यंत मी केलेल्या प्रत्येक कामावर तुम्ही प्रेम केलंय…आणि तुम्हीच दाखवलेल्या प्रेमामुळे मी एका नवीन भूमिकेत तुमच्यासमोर येतोय. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत मी आजपासून वैभव हे पात्र साकारणार आहे. आधीच्या वैभववर जितकं प्रेम केलंत, तितकंच प्रेम माझ्यावरही राहू द्या”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनी वादाचा ‘बेशरम रंग’ला फायदा; दहा दिवसांतच गाण्याला ‘इतके’ मिलियन व्ह्यूज

हेही वाचा>> “अरुंधतीला गाताना पाहून…”, प्रसिद्ध गायकाने ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीसाठी केली खास पोस्ट

निमिशच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हास्यजत्रेत प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा निमिश आता ‘सहकुटुंब सहपरिवार’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame nimish kulkarni entry in star pravah serial sahakutumb sahaparivar kak